शनिवार, २१ मे, २०१६

अरबांची कुत्री – २

पैगंबराचे सोबती महमदाच्या ह्या अल्लाह बद्दलच्या प्रामाणिकपणाने अस्वस्थ झाले होते. विशेषकरून त्याचा सोबती अबू बक्र जो त्याचा सासरासुद्धा होता तो पैगंबराच्या ह्या वागण्याने त्रस्त झाला होता. कितीही सांगितले तरी महमद आपला निर्णय बदलण्यास तयार नव्हता. अबु बक्र महमदापेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठा होता तरी त्या वडीलकीचा आपण सासरे असल्याचा कांहीं परिणाम महमदावर होईल असें त्याला वाटत होते पण व्यर्थ. अबु बक्र बरोबर दुसरा सोबती उथमन इब्न अफ्फन सुद्धा त्याच विचाराचा होता. तिसरा सोबती उमर मात्र द्विधा मनस्थितीत होता. एकदा वाटे महमद बरोबर आहे कारण तो देवदूत गाब्रियलचेच फक्त ऐकत असे, पण त्याच बरोबर अबु बक्र उथमन ह्याचे म्हणणे सुद्धा त्याला पटत होते किं, नव्याने स्थापन झालेल्या धर्माच्या नांवाने अरबांचे साम्राज्य उभे करावे. बाकीचे सोबती मात्र केवळ महमदालाच प्रमाण मानत होते ते सर्व त्याच्या आज्ञेत रहाणे योग्य समजत होते. शेवटी अबु बक्रने त्याच्या मुलीबरोबर संगनमत करून जी पैगंबराची बायको होती महमदाला जेवणातून आरसेनिकचे वीष देण्यास सुरुवात केली. आयेशा तिच्या बापासारखीच महत्वाकांक्षी होती. अबू बक्र अतिशय महत्वाकांक्षी होता त्याच्या कल्पनेनुसार महमदाने शोधलेल्या धर्माचा उपयोग एकाद्या शस्त्रासारखा करून अरबांचे मोठे राज्य उभे करावा असे होते. इतर सोबती महमदाच्या विचारांशी सहमत होते परंतु, ते गरीब अरब होते त्यातील कांहीं ह्या दोघांच्या उद्योगात नोकरी करीत होते त्यामुळे ते विरोध करू शकत नव्हते.
यथावकाश त्या विषाचा प्रभाव दिसू लागला. महमद वेळोवेळी आजारी पडू लागला. त्याच्या ढासळणार्या प्रकृतीची सर्वांना काळजी वाटत होती. शेवटी पैगंबरानी आपला अखेरचा निरोप देण्याचे ठरवले. त्यावेळी त्याची प्रकृती इतकी बिघडलेली होती किं, त्याला हात धरून न्यावे लागत होते. एका बाजूस अबु बक्र त्याच्या मरणाची वाट पहात होता तर त्याच वेळी उथमन दुसर्याच चिंतेत होता. कारण त्यांच्या योजने प्रमाणे अरबेतरांना इस्लामची दिक्षा द्यावयाची होती पण कुराणात तसें करण्याबाबतचे आदेश जागोजागी लिहीलेले होते. म्हणजे केवळ महमदाला संपवून भागणार नव्हते. त्यांना नवीन कुराणसुद्धा तयार करावे लागणार होते. म्हणजे आहे ते कुराण प्रथम नष्ट करावे लागणार त्याच्या जागी नकली कुराण ज्यात त्यांच्या म्हणजे उमायाद अरबांच्या सोयीचे मुद्दे असतील.
महमद त्याच्या शेवटच्या भाषणात पुन्हा सांगतो किं, इस्लाम हा अरबांचा (त्याच्या शब्दात, "माझ्या वंशजांचा") धर्म असून त्यातील अल्लाहसुद्धा अरबांचा देव आहे. तो शेवटी सांगतो कीं, अरब फक्त इस्लामचेच पालन करतील जोवर ते इस्लाम मानतात तोवर त्यांना नेहमी यश मिळेल.
ह्यात कोठेही अरबेतरांचा साधा उल्लेखसुद्धा नाही हे विशेष.
पुढे काय झाले ते पुढच्या पोस्टमध्ये पाहू.

मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या २१४०
जर त्याला माहीत असेल तर त्यांने नियमितपणे ऋषी, देव, भूते, माणसे पितर ह्यांचे सन्मान करण्यास कधीही विसरू नये. २१
भोग इंद्रियाच्या संयमांने जाणकार मंडळी पितरांस दान करू शकतात. टीपः भोग इंद्रीयांचें संयमन हेंच दान असा अर्थ घ्यावा.
संयमाने केलेला प्राणायाम संयमाने केलेले बोलणे हे पितरांसाठी उत्तम प्रकारचे दान ठरते. २३
इतर ब्राह्मण जे समजून असतात किं, ब्रह्मज्ञान हेंच खरे ज्ञान आहे ते ज्ञानयोगांत संतुष्ट होऊन रहातात
ब्राह्मण दिवसाच्या सुरुवातीस अखेरीस अग्निहोत्र करील, दर्श पौर्णमास पंधरवड्यास करील. २५
जुने धान्य संपले आहे तेव्हां अग्रयान करून यज्ञ नव्या पेरणीच्या वेळी पावसाळ्याच्या अखेरीस चातुर्मास अयनाच्या सुरुवातीच्या काळात पशु बळी देऊन आणि वर्षाच्या शेवटी सोम यज्ञ करून तो ब्राह्मण आपले कर्तव्य पार पाडेल. २६
पवित्र अग्नी सांभाळणारा ब्राह्मण जर दिर्घायुषी होऊ इच्छित असेल तर त्यांने नवीन धान्य मांस अग्रयान यज्ञात ते दिल्याशिवाय खाऊ नये. २७
असें करण्याचे कारण, तो अग्नी त्या धान्याचा मांसाचा भुकेला असतो. तसें केल्यास तो अग्नी त्या ब्राह्मणाचे आयुष्य खाऊन फस्त करतो. २८ टीपः पितरांचा प्रमुख आहार मांस आहे. म्हणून ते त्यांने पितरांचे तोंड म्हणून खाणे आवश्यक असते.
ज्या घरात पाहुण्याचा योग्य सन्मान त्याला आसन, जेवण, पाणी, कंदमुळे फळे देऊन केला जात नाही त्या गरांत त्यांने राहू नये. २९
ब्राह्मणांने अयोग्य माणसाकडून आदर करून घेऊ नये. ते लोक असें, आधाशी, पाखंडी, अवैध कामे करणारा, पशु प्रमाणे रहाणारा, चोर, लुच्चा, वेदांचा अपमान करणारे, भगळ्यासारखे वागणारा आहेत. ३०
वेदाचा अभ्यास केल्यानंतर अथवा शपथ विधी (गृहस्थाश्रम) केल्यानंतर जो स्नातक झाला आहे, जो श्रोत्रिय (भेटवस्तु देऊन, वशिल्याने) ब्राह्मण झाला आहे. ३१
गृहस्थाने त्याला परवडेल त्या प्रमाणातच फक्त तेवढा शिधा गरजूंना द्यावा. स्वताची उपासमार होईल असे करून घेऊ नये. ३२
असा नियम आहे किं, स्नातक जो अतिशय भुकेला आहे त्यांने राजाकडे भिक मागावी ज्या राजाकडे तो यज्ञ करतो, इतरांकडे मागू नये. ३३
जो स्नातक संपन्न आहे तो कधीही आणलेली भिक्षा व्यर्त टाकणार नाही जुने फाटलेले वस्त्र नेसणार नाही. ३४
आपल्याला नीटनेटके ठेवून असा स्नातक तत्त्वशिलतेच्या पालनाने भोग इंद्रीयांचें संयमन करून नैतिक जीवन जगेल. तसेंच तो स्वताला देवाच्या अभ्यासात ठेवेत आणि त्याच्या योग्यतेला शोभेल असे वर्तन ठेवेल. ३५
तो नेहमी एका हातात बांबूचा दंड धारण करील, दुसर्या हातात पाण्याने भरलेले पात्र आणि कुस गवताची जुडी धरेल, त्याने जान्हवे परिधान केलेले असेल, त्याच्या बोटात खर्या सोन्याच्या दोन आंगठ्या असतील. ३६
वेदवित् ब्राह्मणांनी कधीही उगवता, मावळता मध्यान्हीचा सूर्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू नये. तसेंच सूर्याचे पाण्यातील प्रतिबिंबसुद्धा पाहू नये. ३७
सर्वमान्य प्रघाताप्रमाणे त्याने ज्या दोराला वासरू बांधले आहे त्या रोपाला ओलांडू नये. पावसात धावू नये, स्वताचे पाण्यातील प्रतिबिंब पाहू नये. ३८
अशा ब्राह्मणांनी मातीचा ढीग, गाय, देवाची मूर्ति, ब्राह्मण, लोणी, मध, रस्त्याचा नाका, मोठे वृक्ष ह्यांच्या दिशेने उजवा हात करून मग ओलांडावेत. ३९

जरी तो कामांध झाला तरी तो पत्नीच्या कडे जाणार नाही जर ती ऋतुस्नात (मासिक पाळीत) असेल. तसेंच ती ज्या बिछान्यावर निजते त्याच बिछान्यावर झोपणार नाही.

मनुस्मृतीचा चौथा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com
आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा