मंगळवार, १० मे, २०१६

अरबांची कुत्री

मी ह्या पोस्टमध्ये इतिहासातील एका अशा भागावर लिहीणार आहे किं, त्याची विशेष चर्चा सहसा होत नाही. तो विषय आहे पाकिस्तानच्या मुसलमान होण्याचा. आज आपण ह्या भूभागाला पाकिस्तान म्हणत असलो तरी हे नांव १९४७ नंतर वापरात आले, त्या आधी त्या भागाचा उल्लेख निरनिराळ्या चार नांवांनी होत असें. ती चार नांवें अशी, बलुचिस्तान, सिंध, पख्तुनिस्तान पंजाब. जेव्हां इस्लामचा उदय इसवी सनाच्या सातव्या शतकात झाला पैगंबराच्या मृत्यूनंतर (हत्त्येनंतर, लिहीणे जास्त योग्य ठरेल) अरबांनी सर्व अरब आखात सभोवारचा भाग ताब्यात घेतला तेव्हा हे घडले. अरबांनी एक कायदा अमलात आणला त्यानुसार त्यांच्या भागातून जर कोणाला व्यापार करावयाचा असेल तर त्याला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल. अरब तो पर्यंत फक्त फारस (इराण) पर्यंत पोहोचले होते वर दिलेले भाग त्यांच्या राज्याचा भाग नव्हत. तरी वर दिलेल्या भागातील लोक मोठ्या प्रमाणात त्या भागातून व्यापार करीत होते. अरबांच्या ह्या कायद्यामुळे बलुचिस्तान, सिंध, पख्तुनिस्तान पंजाब आणि गुजरात मधील व्यापार्यांना त्यांचा धंदा चालू रहाण्यासाठी इस्लाम स्विकारावा लागला. गुजरात मधील दोन जातीतील लोक, भाटीया लोहाणा ह्यांच्यातील कांहीं कुटुंबांनी त्यांचे धर्मपरिवर्तन केले आपला पिढीजात व्यापार तसांच चालू ठेवला. अशारितीने ह्या भागात कोणत्याही प्रकारे लढाई होता इस्लाम आला. हे सर्व त्याकाळात तात्पुरते होते पण पुढे भारतात उत्तरेकडून मोगलांच्या आगमनाने पुन्हा इस्लाम आला मग मात्र हे बाटलेले लोक पूर्णतया कायमचे मुसलमान राहिले. गुजरात मधील बाटलेले भाटीया लोक आज खोजा ह्या नांवाने ओळखले जातात लोहाणा, मेमन ह्या नांवाने ओळखले जात आहेत.

अरब मात्र ह्या बाटलेल्या मुसलमानांना खरे मुसलमान, आपल्या बरोबरीचे मुसलमान म्हणून स्विकारत नव्हते आजही स्विकारत नाहीत. अरबांनी ह्या बाटलेल्या लोकांना मवाली असें नांव दिले आहे. म्हणजे, गुलाम किंवा नोकर पण प्रत्यक्षात मात्र हे अरब ह्यांना त्यांची कुत्री असेंच समजतात. अशारितीने ह्यांना इस्लामची दिक्षा देऊनही बरोबरीचा दर्जा कां दिला जात नाही हे समजणे खरोखरीच महत्वाचे आहे. ह्यांचे कारण, पैगंबराच्या आदेशानुसार अरबांशिवाय कोणीही इस्लाम धर्म पाळणे पाप (शिर्क) आहे. महमदाच्या आदेशानुसार फक्त अरबच मुसलमान असू शकतो. तसें त्यांने अनेक वेळा स्पष्टपणे वेळोवेळी विविध ठिकाणी सांगितले असल्याची नोंद आहे. म्हणजे अशारितीने बाटलेले मुसलमान खरे मुसलमान नाहीत त्यांनी अल्लाहकडे केलेल्या प्रर्थना व्यर्थ असतात. कारण, महमदाच्या म्हणण्याप्रमाणे अल्लाह फक्त अरबांचीच प्रार्थना ऐकतो. महमदाच्या जीवन काळात असें अनेक प्रसंग, अनेक हाडीथ (लोकवार्ता) मध्ये आढळतात. त्याच्या जीवनकाळात कांहीं अरबेतर लोक जसें, असेरियन, आर्मेनियन, फारसी सुदानी त्याला म्हणाले किं, त्यांना इस्लामची दिक्षा मिळावी पण महमद म्हणाले किं, त्यांनी त्यांचा धर्म पाळावा कारण, महमदाच्या ज्ञानानुसार देवांनी निरनिराळ्या मानव समाजांसाठी निरनिराळे धर्म सांगितले आहेत ते ते त्या त्या लोकांनी प्रामाणिकपणे पाळावयाचे आहेत, अशी दैविक आज्ञा आहे म्हणून त्यांनी त्या अरबेतरांना इस्लामची दिक्षा देण्याचे टाळले. म्हणून पैग्बराच्या जीवनकाळात अरबेतर बाटवला गेला नाही. महमदाचे कांहीं सोबती मात्र ह्या त्याच्या देवाशी असलेल्या प्रामाणिकपणाचा तिरस्कार करीत होते. त्याचा परिणाम काय झाला ते आपण पुढच्या पोस्ट मध्ये पहाणार आहोत.

मनुस्मृतीचा चौथा भाग पाहू या २०
आयुष्यातील एक चतुर्थांश भाग शिक्षकांबरोबर जगल्यानंतर पुढचा एक चतुर्थांश भाग गृहस्थाश्रमात लग्न करून तो व्यतीत करतो. टीपः मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे असें मानले जाई त्यातील पहिला चवथा भाग ब्रह्मचर्याश्रमात घालवल्यानंतर तो पुढच्या चवथ्या भागासाठी लग्न करतो असें समजले जाई. त्यानंतरचा चवथा भाग वानप्रस्थाश्रम उरलेला संन्यासाश्रम अशी अपेक्षा असें.
अडचणाचा काळ सोडून एर्हवीच्या काळासाठी ब्राह्मणांनी उपजिविकेसाठी असा उपक्रम करावा किं, ज्यामुळे इतर कोणालाही उपद्रव होणार नाही, किंवा कमीतकमी त्रास होईल.
केवळ पोटापाण्यासाठी त्यांनी असा निरुपद्रवी उपक्रम निवडावा किं, ज्यामुळे त्याच्या शरीरास फार तोशीस होणार नाही.
जगण्यासाठी त्यांने ऋत, अमृत, मृत अथवा प्रमृत असें कोणतेही काम करण्यास हरकत नाही. परंतु, कुत्र्याच्या मोलानी (लाचार होऊन) जगू नये.
ऋत म्हणजे, धान्य जमा करून, अमृत म्हणजे, मांगता मिळणारे, मृत म्हणजे, भिक मांगून मिळविलेले आणि शेती करून मिळणारे त्याला प्रमृत असें काहीही करून पोट भरावे.
हे नाही तर सत्यनृत मार्गांने म्हणजे, सावकारी करून उपजिविका करावी परंतु, स्ववृत्ति म्हणजे, चाकरी करून ब्राह्मणांनी जगणे वर्ज आहे.
त्यांने मिळविलेले साठवून ठेवावे अथवा फक्त गरजे पुरते (तीन दिवसापुरते) साठवावे, किंवा भविष्यासाठी कांहींच बचत करतां रहावे.
ब्राह्मणांच्या चार आश्रमांत (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम) त्यांचे महत्व चढत्या क्रमांने वाढत असते. तसेंच त्याने त्याच्या गुणवत्तेने जगांवर स्वामित्व मिळवावययाचे असते. टीपः मनुसमृतीत पुरुषासाठी चार वर्ण दिले आहेत, स्त्रीसाठी वर्ण, मातृवर्ण असें मार्ग प्रणालीत (शाक्ततंत्रमार्ग) दिले आहे.
पहिल्या आश्रमात तो सहा कामे करतो, दुसर्यात तीन तिसर्यात दोन करीत असतो. शेवटच्या आश्रमात मात्र तो ब्रह्मसत्राचा अवलंब करेल.
जो ब्राह्मण धान्य गोळा करून त्यावर जगतो तो अग्निहोत्र सांभाळेल. त्यासाठी सतत काटक्या गोळा करीत राहील. १०
इतर लोक जे काम पोटासाठी करतात ते काम त्यांने कधीच करावयाचे नसते, त्यांने नेहमीच सत्यांने प्रामाणिकपणे ब्राह्मणाला शोभेल असेंच रहावे. ११
भोगेंद्रियांच्या संयमाने जे सुख मिळेल तेवढेच त्यांने भोगावे. कारण, समाधान हे सुखाचे मूळ आहे असमाधान हे दुःखाचे मूळ आहे. १२ टीपः सुख दुःख ह्या माणसाच्या मनाच्या मानण्यावर अवलंबून असणार्या गोष्टी असतात.
जो ब्राह्मण वर दिलेल्या प्रकारे जगतो तो पुढे दिलेली कामे मोठ्या आत्मियतेने पार पाडेल. त्यामुळे त्याला स्वर्गीय सुख दिर्घायुष्य आणि प्रसिद्धी प्राप्त होईल. १३
कंटाळता तो वेदांचे पठण पवित्र नियमानुसार त्याच्या कुवतीप्रमाणे काम (कर्मकांड) करील. त्यामुळे त्याला त्याच्या क्षेत्रात उच्चतम स्थान मिळेल. १४
तो श्रीमंत असेल अथवा गरीब असेल, त्यांने कितीही खराब परिस्थिती आली तरी असा कोणताही उद्योग करावयाचा नाही ज्यांने त्याचे ब्राह्मणत्वांस बाधा होईल. १५
भोगेंद्रियांच्या आहारी जाऊन त्यांने त्या भोगांत स्वताला अडकवून घेऊ नये. भोगांच्या व्यर्थतेचा पूर्ण विचार करून त्यांने त्यांचा त्याग करावयाचा असतो. १६
पैशाच्या मांगे लागतां पण स्वताला सांभाळून (उपजिविका) वेदांचा अभ्यास करीत रहावे, ज्यामुळे त्यांचे अंतिम उद्दिष्ट (ब्रह्मज्ञानाचे) साध्य होईल. १७
त्याच्या वर्णांस वयांस शोभेल असें त्याचे उद्योग, कपडे, बोलणे विचारसरणी असली पाहिजे. १८
त्यांनी इतरांना उपयोगी येणार्या अनेक शास्त्रांत शोध घेण्याचे काम करावें, जेणे करून ते उद्योग उत्कर्षास येतील, तसेंच वेदांचा अभ्यास निगमाच्या मार्गांने करीत जावे. १९
असें करण्याचे कारण, ही शास्त्रे अभ्यासतांना त्याच्या ज्ञानात भर पडत असते, त्यामुळे त्याचे तेज वाढते. २०

पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा