बुधवार, २० एप्रिल, २०१६

पाण्याचा प्रश्र्न

महाराष्ट्रात भूजल पातळी खूपच खालावली आहे. कुपनळी कितीही खोल नेली तरी पाणी लागण्याचे नांव नको अशी परिस्थिती आज उत्पन्न झालेली आहे. फार पूर्वीपासून महाराष्ट्रात दुष्काळ पडत आहेत. एका सर्वेक्षणानुसार गेल्या हजार वर्षांतील ७२० वर्षे दुष्काळ होता उरलेली २८० वर्षे परिस्थिती बरी होती, उत्तम कधीच नव्हती!

असे असले तरी घरच्या विहीरींना पाणी नाही अशी परिस्थिती कधीच नव्हती. त्या काळांत कुपनलीका (बोअर वेल) नव्हत्या. तंत्रज्ञान तेवढे प्रगत झालेले नव्हते. दुष्काळ म्हणजे खरीपात धान पिकत नसे कारण प्रामुख्याने पाऊस कमी अथवा अजिबात पडणे असें होते. तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्र्न कधीही एवढा वाईट नव्हता. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांवर नेहमीच भरपूर पाऊस पडतो. एका संशोधनानुसार महाराष्ट्रात पडणार्या एकंदर पावसातील ८० टक्के पाऊस ह्या सह्याद्री रांगांत पडतो उरलेला २० टक्के पाऊस इतर भागात पडतो अशी साधारण परिस्थिती असते. ह्या थोड्या पावसात (२० टक्के) खरीपाची शेती करणे शक्य नसते. आणि नंतरच्या म्हणजे रब्बीच्या मोसमासाठी जमिनीत पुरेसे बाष्प टिकत नाही मग रब्बीतसुद्धा चांगले पीक घेणे दुरापास्त होते. आणि त्यामुळे दुष्काळी परिस्थिती वर्षानुवर्ष कायम रहाते.

पूर्वी सह्याद्री पर्वतातून वहाणार्या नद्या महाराष्ट्राच्या सपाट प्रदेशातून वहात पूर्व समुद्रात जाताना पावसाळ्यात पुराच्या पाण्यांनी दुथडी भरून जात असत. त्यामुळे सर्व भूप्रदेश त्या पूराच्या पाण्यांने पूर्णतया भिजत असे. अशा परिस्थितीत जमिनीत पाणी मोठ्या प्रमाणात जिरल्यानें जमिनीची भूजल पातळी सुधारत असें. असें दर पावसाळ्यात होत असल्यानें नेहमीच भूजल पातळी राखली जात असें जमिनीवरच्या विहीरींना कधी पाण्याचा प्रश्र्न झाला नाही.

स्वातंत्र्योत्तर काळी पंचवार्षिक योजनांतर्गत मात्र परिस्थिती तशी राहीली नाही. सह्याद्रीतील सर्वच मोठ्या नद्यांवर भलीमोठी धरणे बांधली गेली त्यांतून नद्यात डोंगरातून निचरा होऊन येणारे जवळ जवळ सर्वच पाणी धरून ठेवले जाऊ लागले. नद्यांना पूर येण्याचे त्यामुळे थांबले त्यामुळे जे अतोनात नुकसान मानव वस्तीचे होत होते तेसुद्धा थांबले. हे पाहिल्यावर राजकर्त्यांना असें वाटले किं, धरणे बांधून त्या मंडळांनी मोठे चांगले काम केले आहे. त्यात ते संतुष्ट झाले.

पूर येणे बंद झाले त्यामुळे कांहीं चांगले जरी झाले तरी बरेच कांहीं वाईटसुद्धा झाले. भूजल पातळी कमी होत गेली. त्यात सुद्धा जोवर जमिनीवरील विहीरी होत्या तोवर ठीक होते पण जसें बोअर वेलचा जमाना आला तसें शेतकरी जास्त पाण्यासाठी कुपनलिका खोदू लागले भूपृष्ठाच्या खूप खालील पाणीसुद्धा उपसले जाऊ लागले ते होत असतांना नवीन पाण्याची भरपाई होत नसल्यानें भूजल पातळी अधिकाधिक उतरू लागली आजची परिस्थिती उत्पन्न झाली आहे. आता काय करावयाचे ते आपण पुढच्या पोस्ट मध्ये पहाणार आहोत.

आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक २५१ - २७६ वाचू या.
श्राद्धाच्या जेवणानंतर यजमान आमंत्रितांना अखेरीस पाण्याचे आचमन घेण्यास देतो, त्यावेळी तो त्यांना विचारतो, "जेवण व्यवस्थित झाले कां"? आचमन केल्यावर ते उत्तर देतात, "तू सुखी होशिल (अन्नदाता सुखा भव)". २५१
त्यावर ते ब्राह्मण म्हणतील, "स्वाधा राहो". असे म्हणण्याचे कारण, स्वाधा हा अशा विधीत. आदिदैवतांच्या ह्या विधीत, महत्वाचा भाग असतो. २५२
त्यानंतर उरलेले जेवणाचे पदार्थ कसे संपवायचे त्याबद्दल ब्राह्मणांना विचारून त्यानुसार त्याचे वितरण करावे. कारण ते सर्व जेवण आदिदैवतांचे असते. २५३
श्राद्धाच्या सन्मानार्थ यजमान पाहुण्या ब्राह्मणांस बोलेल, जर पितरांचे श्राद्ध असेल, "स्वादितं", जर गोष्टी श्राद्ध असेल, शुशुतम् ", जर वृद्धि श्राद्ध असेल, "संपन्नम् ", परंतु जर देवांच्या प्रित्यर्थ असेल, "ऋकीतम्", २५४
श्राद्धविधीतील महत्वाच्या गोष्टी आहेत, दुपार, कुस गवत, घराची व्यवस्था, तीळाचे दाणे, दयाळू वागणे, चांगल्या प्रकारे खाद्यपदार्थ तयार करणे आणि योग्य ब्राह्मणांची संगत. २५५
लक्षात असु दे किं, कुस गवताबरोबर पवित्र करणारे लिखाण, सकाळ, प्रसादाचे सर्व प्रकारचे (आमिष, शाकाहारी, सामिष, मांसाहारी) खाद्यपदार्थ, पवित्र करण्याचा साधने, जी वर दिली आहेत ही असणें भाग्याचे समजावे कारण, त्यामुळे देवांना प्रसाद देणे जमते. २५६
बैरागी (जोगी) वनात जे खातात जसें, दूध, सोमवेलीचा रस, मसाले लावलेले भाजलेले मांस, नी मीठ, हे सर्व पितर देव ह्यांसाठी प्रसादाचे समजावे. २५७
सर्व ब्राह्मणांना यथायोग्यपणे निरोप दिल्यानंतर यजमान एकांतात मनाची एकाग्रता करून दक्षिणेकडे तोंड करून बसेल पितर देव ह्यांची कृपा व्हावी म्हणून मोठ्या आदराने त्यांचे स्मरण करील. २५८
तो स्मरण करतांना प्रार्थना करील किं, शहाणे वेदाचे ज्ञान असलेले लोक माझ्या बरोबर नेहमी राहोत, आमची संख्या वाढो, आमची तुमच्यावरील श्रद्धा वाढो, गरजू लोकांना मदत करण्याची आमची ताकद वाढो. २५९
असे स्मरण केल्यानंतर तो पिंड देईल नंतर ते पिंड तो गाय, ब्राह्मण, शेळी अथवा अग्नी ह्यांना खाण्याम देईल अथवा हे कोणीही नसतील तर ते पिंड पाण्यात जेथे मांसे वावरतात त्यात अर्पण करील. २६०
कांहीं पिंडदान जेवणा आधी करतात तर कांहीं पक्षांना देतात किंवा आगीत अथवा पाण्यात सोडतात. २६१
यजमानाची पहिली पत्नी जर पितराबाबात श्रद्धावान असेल आणि पुत्ररत्नाची अपेक्षा असेल तर तिने मधला पिंड खावा. २६२
तिला तेजस्वी, दिर्घायुषी, सुप्रसिद्ध संपन्न होणारा, ज्याला पुष्कळ संतति होईल असा, चांगला वर्तणूक असलेला सद्गुणी पुत्ररत्न होईल. २६३
स्वताचे हात धुतल्यावर तो आचमन (चुळा घेऊन तोंड स्वच्छ करील) घेईल नंतर पित्याकडील वडीलधार्यांसाठी जेवण बनवेल आणि ते त्यांना प्रेमांनी वाढेल. त्यानंतर तो आईकडील वडीलधार्यांसाठी जेवण बनवेल ते त्यांना प्रेमांने वाढेल. २६४
ब्राह्मण त्यांचे जेवण उरकून उठे पर्यंत तो तेथे ठेवलेले अन्न तेथून उचलणार नाही. त्यानंतर तो दैनंदीन इतर जसें रोजचे बळी विधी शास्त्रात दिले आहेत तसें करील. २६५
आता मी सांगतो, पितरांना (आदिदैवते) दिलेल्या कोणत्याही प्रसादामुळे कोणती चिरकाल टिकणारी फळे मिळतील. २६६
यजमानाचे पूर्वज तीळ, तांदूळ, जवस (बार्ली), वटाणे, पाणी, कंदमुळं, फळं, ह्याच्या रितसर केलेल्या प्रसादांने एक महिना संतुष्ट रहातील. २६७ टीपः शाकाहारामुळे एक महिना.
मासळीच्या प्रसादाने दोन महिने काळवीटाच्या मांसांने तीन महिने, शेळी, मेंढी ह्यांच्या मांसाने चार महिने आणि पक्षाच्या मांसाने पांच महिने संतुष्ट रहातील. २६८
डुकराच्या मांसाने सहा महिने, ठिबक असलेल्या हरणाच्या मांसांने सात महिने, काळ्या काळवीटाच्या मांसांने आठ महिने, ऋरू जातीच्या हरणाच्या मांसाने नऊ महिने. २६९
रानडुकराच्या रेड्याच्या मांसाने दहा महिने, सशाच्या कासवाच्या मांसाने अकरा महिने पितर संतुष्ट रहातील. २७०
बारा महिन्यासाठी गाईचे मांस वा लांब कान असलेल्या बोकडाच्या मांसाचा प्रसाद ब्राह्मणांना द्यावयाचा असतो. २७१
कालसक नांवाची भाजी आणि महासल्क नांवाचा मांसा, लाल रंगाचा बोकड, आणि वनातील जे खाण्यायोग्य खाद्य असेल जे वनवासी खातात ह्यांच्यामुळे चिरकाल समाधान पितरांना देवांना मिळते. २७२
पावसाळ्यातील माघ नक्षत्रातील शुक्लपक्षातील त्रयोदशीच्या दिवशी जे कांहीं मधाबरोबर खाण्यास पितरांना वाढाल त्यामुळे कायम समाधान प्राप्त होईल. २७३
त्याच्या कुळात असा माणूस जन्मो जो आम्हाला गाईचे मांस अथवा गाईच्या दूधात बनवलेला मध लोण्याचा भात भाद्रपद महिन्यातील त्रयोदशीच्या दिवशी जेव्हां हत्तीची सावली पूर्वदिशेला पडते तेव्हां वाढेल. अशी नेहमी पितर अपेक्षा करतात. २७४
त्याशिवाय जे खाद्यपदार्थ यजमान मनापासून प्रेम आदरांने पितरांना पवित्र नियमानुसार देतो त्या सर्वांमुळे पितर कायम संतुष्ट होतात. २७५
कृष्णपक्षातील दशमी पासून चतुर्थी (पण चतुर्थी सोडून) पर्यांतचा काळ श्राद्धासाठी (फक्त) उत्तम समजला जातो. २७६
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा