बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

सत्य आणि हितचिंतन

सर्व धर्मांत सत्याचा विशेष उल्लेख केला जातो. सत्य हे सर्वश्रेष्ठ आहे असें आवर्जून सांगितले जात असते. सत्य म्हणजे पुण्य असे सांगितले जाते. सत्याची व्याख्या अशी करतात किं, जे प्रत्यक्ष घडले अथवा घडत आहे ते सांगणे. परंतु, बर्याच वेळा सत्य हानिकारक शाबीत होते असे दिसून येते. सत्य बोलण्यामुळे एकाद्या माणसाचे, समाजाचे जीवन बरबाद झाल्याची अनेक उदाहरणे आढळून येतात. अशा वेळी काय करावे असा सवाल माणसाला पडतो. ह्याठिकाणी सत्य हितकारक ह्या दोन गोष्टींपैकी कोणती जास्त श्रेयस्कर ते ठरवावे लागते.

एक उदाहरण नेहमी दिले जाते ते असें, एक सज्जन गृहस्थ दोन रस्त्यांच्या नाक्यावर उभा आहे अशा वेळी तो पहातो किं, एक स्त्री समोरच्या वाटेने धांवत धांवत येते एका बाजूच्या वाटेने निघून जाते. थोड्याच वेळांने दोन गुंड त्याच वाटेने धांवत येतात नाक्यावर उभ्या असलेल्या गृहस्थास विचारतात किं त्याने एक स्त्री धांवत जातांना पाहिली कां? त्यांच्या प्रश्र्नावरून तो गृहस्थ ओळखतो किं ते त्या बाईच्या मागे असून त्यांचा उद्देश चांगला नाही. आता अशावेळी त्याला प्रश्र्न पडतो काय सांगावयावे? जर सत्य सांगितले तर त्यामुळे त्या बाईला नुकसान होणार हे निश्र्चित जर असत्य सांगितले तर असत्य सांगण्याचे पाप लागणार. त्या भल्या गृहस्थाने असत्य बोलून त्या बाईचे हित करणे जास्त हितकारक आहे असें लक्षात घेऊन त्या गुंडांना ती बाई ज्या वाटेने गेली त्याच्या नेमकी विरुद्ध दिशा दाखवली त्या बाईचे हित केले. येथे सत्यापेक्षा हितचिंतन त्याला जास्त श्रेयस्कर वाटले तेंच योग्य आहे.

असे अनेक प्रसंग जीवनात येतात जेव्हा सत्यापेक्षा हितचिंतन जास्त क्षेयस्कर ठरते. माणसें जीवनात बर्याचवेळी खोटे बोलतात त्या मागील उद्देश सुद्धा हाच असतो. किंबहुना माणसे हितचिंतन सत्यापेक्षा नेहमीच जास्त महत्वाचे आहे असेंच मानतात. म्हणजे, हितचिंतन सत्यापेक्षा नेहमीच जर जास्त श्रेयस्कर आहे तर धर्मांत असे स्पष्टपणे कां सांगितले जात नाही असा सवाल उभा रहातो. वर्तमान पत्रे बातम्या देतांनासुद्धा खर्या बातम्या देतां त्या बदलून थोड्या खोट्या करून म्हणजे सेंसॉर करून देतात, एकादा माणूस मेला असे स्पष्टपणे सांगता, तो फार आजारी आहे असे खोटे सांगून ऐकणार्याच्या मनाची तयारी करणे जास्त योग्य समजतात. हे करतांना पाप लागत नाही असें सर्वजण समजतात. आता प्रश्र्न असा पडतो, जर सत्यापेक्षा हितचिंतन श्रेष्ठ असते तर तसें कोणत्याही धर्मात कां स्पष्टपणे स्विकारले जात नाही? हितचिंतन ही व्यवहारीकता असें समजतात ते सर्वजण पाळतात. सत्य हितचिंतन ह्यांची योग्यायोग्यतेची चर्चा कोणत्याही धर्मात कां नाही असा सवाल पडतो.

वाचकांना माझा सल्ला आहे किं, पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही खोटे बोलाल तेव्हा कोणाच्या हितचिंतनासाठी ते तुम्ही केले त्यामुळे खरोखरच हितचिंतन झाले कां ते तपासून पहा.

आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लोक ९१ - २४ वाचू या.

घराच्यावरच्या माळ्यावर फेकावे ते सर्वात्मभूती (वास्तुदेव) साठी असेल. शेवटी उरलेले दक्षिणेस फेकावे आदिदेवतांसाठी म्हणजे पितरांसाठी. ९१
हळुवारपणे आदरपूर्वकपणे असें त्यानी अन्न कुत्री, उपेक्षित, रोगजर्जर (स्वपक) जे आधी केलेल्या पापाचे फळ म्हणून भोगत आहेत. तसेंच कावळे, बारीक किडी किटक ह्यांसाठी द्यावे. ९२
जो ब्राह्मण अशारितीने सर्व भूतांचा आदर करील तो सरळ उच्च स्थानी म्हणजे ब्रह्माकडे जाईल. ९३
हे सर्व केल्यानंतर तो आधी अतिथीला जेवण देईल. पवित्र नियमांनुसार त्यानंतर तो संन्यासी विद्यार्थ्यांना जेवू घालील. ९४
द्विज गृहस्थ दान करून तेंच पुण्य मिळवतो जे विद्यार्थी शिक्षकाला गाय दान करून मिळवतो. ९५
पवित्र नियमांनुसार वेदांचा अर्थ जाणणार्या ब्राह्मणांस त्याने थोडेतरी अन्न दान करावे, निदान भांडे भरून पाणी द्यावें, किंवा मसाल्याने तयार केलेले चवीष्ट खाद्यपदार्थ, फळे फुले द्यावीत. ९६
अज्ञानी माणसांने केलेले तर्पण व्यर्थ जाते. त्यातून जर ते त्यानें ब्राह्मणाला दिले तर त्याची राख झाली असें समजावे. ९७
ज्ञानी ब्राह्मणाच्या तोंडी दान केले तर त्यामुळे दान करणार्याची अनेक पापें कमनशीब संपुष्टात येते. ९८
पवित्र नियमांनुसार, जर अनपेक्षित अतिथी आला तर त्यास बसण्यास आसन पिण्यास पाणी सुग्रास अन्न, यजमानाच्या ऐपतीनुसार जेवण द्यावें. ९९
कारण, असंतुष्ट ब्राह्मण घरातून जातांना यजमानाचे आध्यात्मिक तेज घेऊन जात असतो. १००
तृण, विश्रांतिसाठी खोली, पिण्यासाठी पाणी, प्रेमाचे शब्द ह्या गोष्टी सज्जन माणसाकडे नेहमी असावेत. १०१
एक रात्र रहाणार्या ब्राह्मणास अतिथी समजावे. १०२
त्याच गांवात रहाणार्या ब्राह्मणास अतिथी समजू नये. तसेंच समाजकार्य करणारा ज्याच्या घरी अग्नि आणि पत्नी आहे त्यास अतिथी समजू नये. १०३ टीपः ते सर्वजण, पाहुणे समजावेत.
जे मूर्ख लोक दुसर्याच्या कडून उपजिविकेसाठी मदतीची अपेक्षा करतात ते त्या भिक्कारड्या वृत्तिमुळे मृत्युनंतर ज्याच्या पैशावर राहीले त्याच्या घरची गुरढोरं बनून जन्मतात. १०४
तिन्हीसांजाच्या वेळी आलेल्या पाहुण्यास आसरा देणे चांगले असते. त्यास रात्रीचे जेवण द्यावे. त्याची चांगले खातरजमा करावी. १०५
अशा अनाहुत पाहुण्यास चांगले जेवण द्यावे त्यास बळी (मांसाचा प्रसाद) द्यावा. जे गृहस्थ स्वतः खातो तेंच द्यावे. अशारितीने पाहुणचार केल्यानें यजमानाची ख्याती होते, धनदौलत वाढते, दीर्घायुष्य मिळते आणि आशिर्वाद मिळतात. १०६ टीपः मनुस्मृतीच्या काळांत ब्राह्मण मांसाहार करीत असत. नंतर आदिशंकराचार्यांस मंडणमिश्राने वादात हरवल्याने त्यावेळी घातलेल्या अटींमुळे ऋग्वेदी यजुर्वादी ब्राह्मण शाकाहारी झाले इतर हिंदूनासुद्धा विविध दिवशी शाकाहार करण्यास भाग पाडू लागले.
पाहुणा जर यजमानापेक्षा उच्च वर्णाचा असेल तर त्यानुसार त्याच्या उच्चदर्जाचा पाहुणचार करावा. खालच्या वर्णाचा असेल तर कमी प्रतिचा परंतु अपमान होणार नाही असा पाहुणचार करावा बरोबरीचा असेल तर त्यानुसार करावा. १०७
जर त्याचवेळी दुसरा पाहुणा आला तर त्यालासुद्धा जेवण द्यावे परंतु बळीचे (मांसाहाराचे) जेवण देण्याची आवश्यकता नाही. १०८
जो ब्राह्मण यजमानाकडून चांगला पाहुणचार मिळावा म्हणून स्वताच्या गोत्राची तारीफ करतो तो शहाण्या लोकांच्या दृष्टीत वंतसीन (फुकट्या) ठरतो. १०९
ब्राह्मणाकडे जर कोणी क्षत्रिय, वैश्य अथवा शुद्र पाहुणा म्हणून आला तर त्याला अतिथीचा मान मिळणार नाही. तसेंच यजमानाचा मित्र, नातेवाईक, शिक्षक आला तर त्यालासुद्धा अतिथीची वागणूक द्यावयाची नसते. ११० टीपः अतिथी त्रयस्थ असावा लागतो, पाहुणा परिचित असतो. हा फरक अतिथी पाहुणा ह्यांत धरलेला आहे.
जर क्षत्रिय पाहुणा ब्राह्मणाकडे आला तर त्याला जेवण वाढावे परंतु ते ब्राह्मण अतिथीचे जेवण झाल्यानंतर. १११
वैश्य शुद्र पाहुणा आला तर त्याला सेवकाच्या बरोबर जेवणांस वाढावे आपली दयाबुद्धि दाखवावी. ११२
इतर मित्रमंडळी प्रेमाने भेटावयांस आली तर त्यांना आपत्या पत्नी सोबत उत्तम जेवण वाढावे. ११३
नवविवाहीत जोडपे, लहान मुलं, आजारी गर्भवती अशा सर्वांस अतिथीच्या आधी जेवणांस बसवावे. ११४
जो, जरी वेदांचे पठण करीत असला तरी पाहुण्यांच्या आधी जेवणांस बसतो तो, त्याच्या मृत्युनंतर कुत्री गिधाडांच्या आहारी जातो, तो महामूर्ख समजावा. ११५
ब्राह्मण, नातेवाईक नोकर मंडळी जेवून तृप्त झाली किं नंतर यजमान त्याची पत्नी जेवावयास बसतील. ११६
देव, ऋषी, पाहुणी माणसे, पितर (आदिदैवते) वास्तुदेव ह्यांना संतुष्ट केल्यावर यजमानाने उरलेले अन्न सेवन करावे. ११७
जो फक्त स्वतः पुरते जेवण करून ते खातो तो पाप करीत असतो कारण, उरलेले अन्न खाणेंच पुण्यवान माणसांचे लक्षण आहे. ११८
वर्षात पहिल्यांदा येणारे पाहुणे जसें, राजा, अधिकृत पुरोहित, निद्यार्थी, शिक्षक, जावई, सासरा, मामा इत्यादि त्यांचे स्वागत मध लोणी असा प्रसाद देऊन करावे. ११९
यज्ञ करण्यासाठी आमंत्रित असलेले राजा, श्रोत्रीय (यज्ञ कार्यात पौरोहित्य करणारे ब्राह्मण) ह्यांचे आदरतीथ्य (स्वागत) मध लोण्याच्या प्रसादांने करावे, परंतु त्याव्यतिरीक्त कारणांने ते आला असतील तर मात्र असे स्वागत करण्याची आवश्यकता नाही. १२०
पत्नी संध्याकाळी शिजवलेल्या मांसाचा प्रसाद वेदांतील ऋचा बोलतां वैस्वदेवाला देईल तसें सकाळीसुद्धा करावयाचे असते. १२१
पितृयज्ञ केल्यावर ब्राह्मण, जो पवित्र अग्नी बाळगतो, दर महिन्याच्या प्रतिपदेस पितर स्वतःच्या भल्यासाठी श्राद्ध करील. अशा श्राद्धास पिंडांवहार्यक असें म्हणतात. १२२
शहाणा दर महिन्याला पूर्वजांच्या कल्याणासाठी पितरांना पिंडदान करील. त्या विधीस अन्वहार्य असें म्हणतात. ते विशेष काळजीपूर्वकपणे करावे. पिंडदानानंतर पुढे काय करावे ते पुढे दिले आहे ते पहा. १२३
अशा निमित्तात ब्राह्मणांने कसे जेवण द्यावे ते सांगतो, काय करू नये काय करावे ते पहा. १२४
टीपः मनुस्मृतीत यजमानाने काय करावे त्यावर बरेंच निरुपण आहे परंतु, अतिथी पाहुणा ह्यांनी कसे वागावे त्याबद्दल लिहीलेले नाही.
पुढील पोस्ट पासुन मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा