सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

पाप व पूण्य म्हणजे काय?

माणूस त्याच्या जीवनात सतत कांहीं ना कांहीं चांगले अथवा वाईट काम करीतच असताे. कांहीं वाईट केले कीं पाप केले असे सांगितले जाते. चांगले केले कीं, पूण्य केले असे सांगितले जात असते. पाप, गुन्हा, चूक हे शब्द पर्यायी आहेत अशा प्रकारे ते वापरले जातात. पण ते खराेखरच पर्यायी आहेत कां? त्याचा विचार आपण फारसा करीत नाही. पाप हा शब्द साधारणपणे धार्मिक अर्थाने जास्त करून वापरला जात असताे. गुन्हा हा शब्द बहुधा न्यायालयीन म्हणजे, वैधानिक बाबतीत जास्त करून वापरला जाताे. आणि चूक हा शब्द नैतिक दृष्टीने वापरला जाताे असे साधारण स्वरूप ह्या तीन शब्दांच्या बाबत आढळून येते. ह्या तीनही शब्दांचा समाईक अर्थ असताे, अयाेग्य. जेव्हा धार्मिक दृष्ट्या अयाेग्य गाेष्ट एकादा माणूस करताे तेव्हां त्याने पाप केले असे समजले जाते. त्याचप्रमाणे, वैधानिक दृष्ट्या अयाेग्य काम केले जाते तेव्हां गुन्हा झाला असे समजले जात असते; अाणि नैतिक दृष्ट्या अयाेग्य केले कीं चूक झाली असे धरले जाते. चूक झाली तर ती सुधारावी एवढीच अपेक्षा असते. गुन्हा झाला तर मात्र त्याला शिक्षा हाेत असते. आणि जेव्हां पाप घडते तेव्हां त्यासाठी पापभाेग भाेगावे लागतात असे समजले जाते. पापभाेग म्हणजे काय तर आपल्याला जी दुःखे जीवनात भाेगावी लागतात ती सर्व अशा गेल्या जन्मी केलेल्या पापामुळे भाेगावी लागतात असे समजले जाते. गुन्ह्याची शिक्षा मात्र त्याच जन्मी आपल्याला भाेगावी लागत असते. चूक झाली तर केव्हा तिला माफ करता येते तर कधी ती सुधारण्याची संधी म्हणजे, पश्र्चात्ताप करण्याची संधी दिली जाते. गुन्ह्याला माफ हाेत नाही म्हणून एकाद्या कृत्याला केव्हा गुन्हा समजावयाचे व केव्हा चूक हे ठरवणे अवघड असते.

निरनिराळ्या धर्मांत पापाची व्याख्या वेगवेगळी केलेली आहे. बहुतेक धर्मांत तरीसुद्धा त्या धर्माचे नियम माेडल्यास पाप झाले असे समजले जाते. त्याचप्रमाणे, गुन्ह्याची व्याख्या तशीच म्हणजे, त्या कायद्याचे उल्लंघन करणे म्हणजे गुन्हा, अशी केलेली असते. चूकीच्या बाबतसुद्धा तसेंच काहीसे असते. म्हणजे आखून दिलेले रिवाज नाही पाळले कीं, चूक झाली असे समजले जात असते.

हिंदू मान्यतेनुसार मात्र पापाची व्याख्या जरा वेगळी केलेली अाहे. हिंदू मान्यतेनुसार पाप म्हणजे असे कृत्य ज्यामुळे त्या माणसाची अध्यात्मिक पातळी खालावते व पूण्य म्हणजे अध्यात्मिक पातळी उंचावते. मानसाची अध्यात्मिक पातळी ही प्रमूख बाब असते. कारण हिंदूंच्या समजाप्रमाणे, माणसाचा जन्म त्याची अध्यात्मिक पातळी उंचावण्यासाठी असताे. पुण्यकृत्यामुळे माणसाचा अध्यात्मिक दर्जा सुधारताे व पापकृत्यामुळे ताे घसरताे असे समजले जाते. बर्याच वेळी गुन्हा व चूक पाप ठरत नाही. उदाहरणार्थ, आयाकर नाही भरला तर ताे गुन्हा ठरताे पण ते पाप ठरत नाही. रस्त्यावर थुकणे ही चूक आहे पण ते पाप नाही. ह्यावरून पाप हे गुन्हा व चूक ह्यापेक्षा वेगळे आहे हे लक्षात येईल.

माणसाची अध्यात्मिक पातळी त्याच्या गुणावरून ठरवली जाते. जसे, तमाेगुणी माणसाची पातळी खालची समजली जाते व रजाेगुणीची मध्यम आणि सात्त्विक माणसाची पातळी उच्च असे समजले जाते. ह्याचा अर्थ, जस जसें माणूस त्याची अध्यात्मिक पातळी सुधारु लागताे तस तशी त्याची गुणाची अवस्थासुद्धा बदलत असते. याेगशास्त्रात ह्या नेहमीच्या तीन गुणांत आणखीन दाेन गुण वाढवून दिलेले आहेत, ते असें, सात्त्विकच्या वर संतगुण आणि तामस् च्या खाली आणखीन एक गुण ज्याला दुर्जन गुण असे समजले जाते. माणसाला जेव्हां अध्यात्मिक साधना करावयाची असते तेव्हां त्याने प्रथम त्याचा गुण सुधारून ताे संत अवस्थेत आणावयाचा असताे. त्यानंतरच त्याने ध्यान साधना करावयाची असते. संत अवस्थेत न येता जर त्यांने खालच्या पातळीवर असतांना ध्यान साधना सुरू केली तर त्या साधनेचा त्याला काहीही फायदा हाेत नाही. पुढे कधीतरी आपण याेगशास्त्रानुसार काेठली कृत्य पापकारक व काेठली पूण्यकारक ते पहावयाचे आहे.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लाेक ७१ – ९० वाचू या.
जाे यजमान ही दाने करीत नाही ताे जरी जगत असला तरी मेल्यागतच समजावा. ७२
ह्या दानाना क्रमाने पांच नांवे आहेत ती अशी, अहुत, हुत, प्रहुत, ब्रह्महुत आणि प्रसीत. ७३
अहुत म्हणजे, अग्नीशिवाय, त्यात वेदमंत्र मनातल्या मनात पुटपुटणे असते. हुत म्हणजे, देव व पितर ह्यांना हवन करून आहुती देणे. प्रहुत म्हणजे, जमिनीवर पक्षांसाठी दाणे टाकणे हे भूतांसाठी असते. ब्रह्महुतात ब्राह्मणाला दान करावयाचे असते. प्रसीत म्हणजे, पितरांना तर्पण करणे. ७४ टीप: असे केल्याने संसारीक कामात जी लहान माेठी पापे माणूस करताे त्यांपासून मुक्ति मिळते असे समजले जाते.
सर्व यजमानानी दरराेज वेदपठण करावे व ते करतांना अशी दाने करावीत, त्यामुळे. तसे करणार्याला चराचर वस्तुमात्रांचे आशिर्वाद प्राप्त हाेतात. ७५
यज्ञातील हवनात आहुती दिल्यामुळे अग्नी चेतावताे ती आहुती सूर्यास मिळते, त्यातून वर्षाऋतु उत्पन्न हाेताे. पावसामुळे पी पिकते त्यामुळे सर्व प्राणिमात्रांचे जीवन बनते. ७६
अशाने सर्व चराचर ह्या दानामुळे जगू शकतात. ७७
ब्राह्मणाच्या अशा दरराेजच्या दानामुळे (ज्ञान, अन्न इत्यादि) इतर वर्णांच्या मंडळींस सुद्धा फायदा हाेत असताे. ७८
येथे दिलेली कर्तव्ये, कमजाेर व ज्यांची भाेग इंद्रीये व्यवस्थितपणे काम करीत नाहीत असे साेडून, इतरांनी काळजीपूर्वकपणे केल्यास ते सदा सुखी हाेतील व स्वर्गाची दारे त्यांना उघडतील. ७९
ऋषीमुनी, पितर, देव, भूते आणि अतिथी नेहमीच यजमानाकडून कांहीं भेटवस्तु अपेक्षित असतात. त्यांची पूर्तता यजमानाने त्याच्या कुवतीनुसार पूर्ण करावी. ८० टीप: देण्याची इच्छा ही महत्वाची असते. त्यालाच दानत असे म्हणतात. काय दिले ह्यापेक्षा दिले हे महत्वाचे असते.
पवित्र नियमांप्रमाणे यजमानाने वैदिक ऋचा माेठ्याने उच्चारुन ऋषींना संतुष्ट करावे, हवनात आहुती देऊन देवांना संतुष्ट करावे, माणसांना काही आनंद देणार्या भेटवस्तु, खाद्यपदार्थ देऊन संतुष्ट करावे व भूतांना मांसाचा बळी देऊन संतुष्ट करावे. ८१
दरराेज अन्न, पाणी, दुध, कंदमुळं, फळं अशा गाेष्टी देऊन पितरांची कृपा संपादन करावयाची असते. ८२
श्राद्धात निदान एका ब्राह्मणास भाेजन देऊन पितरांचा सन्मान करावा. मात्र वैस्वदेव दानाचे ब्राह्मन भाेजन म्हणून ते करू नये. ८३
गृहसुत्राच्या नियमांनुसार शिजविलेले अन्न वैस्वदेव आहुती म्हणून खाली दिलेल्या देवांसाठी आहुती म्हणून द्यावे. ८४
प्रथम अग्नी त्यानंतर साेम त्यानंतर ह्या दाेनही देवांस एकत्रितपणे त्यानंतर इतर देव जसे, विस्वदेव आणि धन्वंतरी, ८५
त्यानंतर कुहु (चंद्राेदयाची देवता), अनुमति (पाेर्णिमेच्या चंद्राची देवता), प्रजापति (विश्र्वकर्ता देवता), स्वर्ग व पृथ्वी एकत्रितपणे, शेवटी अग्नि स्विश्तक्रीत (यज्ञाची देवता). ८६
अशारितीने पवित्र दान केल्यानंतर बळीचा (मांसाचा) प्रसाद सर्व दिशांना फेकावा. त्यासाठी पूर्वेपासून सुरुवात करावी नंतर दक्षिण, पश्र्चिम व शेवटी उत्तर दिशेने फेकावे. ते इंद्र, वरूण, यम, साेम ह्या देवतांना मिळेल. तसेंच, त्याशिवाय ह्या देवांच्या दासांनासुद्धा मांसाचा प्रसाद द्यावा. ८७
"मरूत देवाचा सन्मान हाे", असे बाेलून कांहीं अन्न जमिनीवर व "जलदेवाचा सन्मान हाे", असे बाेलून पाण्यात टाकावे. "वृक्षवेलींचा सन्मान हाे", असे बाेलून खलबत्त्यावर टाकावे. ८८
बिछान्याच्या डाेक्याच्या बाजूस अन्नाचे दान करील ते नशिब उघडावे म्हणून असेल, त्यानंतर पायाच्या बाजूस करील हे भद्रकालासाठी असेल, घराच्या मध्यभागी ब्राह्मणाचे व वास्तुश्पतीसाठी (ही गृहदेवता) दान असेल. ८९
कांहीं बळी (मांसाचा प्रसाद) आकाशाकडे फेकावा ते सर्व देवांसाठी असेल. कांहीं बळी दिवसाच्या मध्ये फेकावा ते पिशाच्च्यांसाठी असेल. रात्रीच्या मध्ये (मध्यरात्री) फेकावे ते रात्री फिरणार्या पिशाच्च्यांसाठी असेल. ९० टीप: हे सर्व देण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी असते. देण्याची इच्छा म्हणजे दानत, ती दाखवावी म्हणजे ह्या देवतासुद्धा देण्याची दानत दाखवतात व त्यामुळे फायदा हाेताे असे समजले जाई. म्हणून थाेडे थाेडे फेकले तरी चालते.

पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा