बुधवार, १० जून, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-६

मागल्या भागाकडून पुढे चालू
जगाचे एक वर्ष देवाचा एक दिवस असतो. त्यातील ज्या अर्ध्या काळात सूर्य उत्तरेकडे सरकत असतो तो काळ दिवस समजला जातो व नंतरचा अर्धा जेव्हा सूर्य दक्षिणेकडे सरकतो तो रात्र समजला जातो. ६७
ब्रम्हाच्या रात्र व दिवसाची व अनेक युगांची माहिती व त्यांचे क्रम आता थोडक्यात पहा ६८
कृत युग देवांच्या चार हजार वर्षाचे असते, त्याच्या आधीची संध्या अनेक वर्षाची व नंतरची अनेक वर्षाची असते. ६९
त्यानंतरची युगे त्यांच्या संध्याकाळात मिसळून गेलेली असतात. म्हणजे, ही युगे एकमेकात मिसळून येत असतात. ७०
अशी बारा हजार वर्षे माणसाच्या जगाची असतात. ते देवांचे एक युग समजले जाते. अशी देवांची एक हजार युगे ब्रह्माचा दिवस असतो, तितकीच वर्षे ब्रह्माची रात्र असते. ७१-७२
ह्यावरून असे दिसते की, ब्रह्माचा पवित्र दिवस देवांच्या हजार वर्षानंतर संपतो. असे ब्रह्माचे दिवस व रात्र असतात. ७३
ब्रह्माची रात्र संपल्यावर तो जागा होतो. जागा झाल्यावर आधीची सृष्टी नष्ट करतो व नवीन खरी व खोटी सृष्टी तो त्याच्या विचारांतून उत्पन्न करतो. ७४
नवीन सृष्टीचे नियम वेगळे असु शकतात. कारण हे सर्व नियम ब्रह्माच्या विचारानुसार असतात. नवीन सृष्टी उत्पन्न होतांना पहिला आवाज होतो ७५
त्यानंतर वारा सुरू होतो. तो सर्व प्रकारचे गंध पसरवतो. त्यातून स्पर्शाची उत्पत्ति होते. ७६
त्या वार्यातून तेजस्वी प्रकाश उत्पन्न होतो आणि तो सर्व अंधार नाहीसा करतो. त्यातून रंग निर्माण होतात. ७७
त्यातून पाणी व स्वाद (रुची) निर्माण होते. पाण्यातून जमीन व अशा क्रमाने सर्व सृष्टी तयार होत जाते. ७८
जगाच्या बारा हजार वर्षाच्या काळाला एकाहत्तरपट केले कीं मनुचा एक काळ ठरतो. त्याला मन्वंतर म्हणतात. ७९
असंख्य मन्वंतरात निर्मिती व नाश असें सतत होत असते. ८०
कृतयुगात धर्म चार पायांचा असतो, तो पूर्णरुप असतो, त्या काळात मानवाने असत्य कृत्य केले तर त्याचा फायदा त्याला होत नाही. ८१


हल्ली शास्त्रज्ञ बिग बँग थियरी सांगतात त्याचा येथे उल्लेख झाला आहे असे दिसते

मनुस्मृती पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा