रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

हिंदू कोण - २

मागिल पोस्ट पासून चालू -
लेखकाचे दोन शब्द -
मनुस्मृतीचे मराठी भाषांतर उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाचन अनेक सुशिक्षित ब्राह्मणेतर हिंदूंनी केले. त्यानंतर त्यांच्या असें लक्षात आले किं, मनुस्मृती ही केवळ ब्राह्मणांना जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी आहे. ब्राह्मणेतर हिंदूंसाठी काय मार्गदर्शन असेल असा प्रश्र्न त्यातून उत्पन्न झाला. प्रदीर्घ संशोधनानंतर असे आढळून येते किं, ब्राह्मणेतर हिंदूंचे जीवन अनेक परंपरांनी निश्र्चित केलेले आहे. त्याच्यासाठी कोणतेही एक पुस्तक नाही. तसेंच आणखीन एक गोष्ट दिसून आली ती अशी किं, हिंदू परंपरा सतत कालमानानुसार उत्क्रांत होत आहेत. म्हणजे गेल्या शतकातील हिंदू रीतीरिवाज आज प्रचारात नाहीत. तसें ब्राह्मण धर्मांत इतर धर्मांत नसते. त्या फरकांमुळे हिंदू परंपरा इतर धर्मापेक्षा (त्यात ब्राह्मणधर्मसुद्धा आला) वेगळ्या रहातात. आता अशी परिस्थिती आहे किं, सर्व सुशिक्षित हिंदू हे समजून चुकले आहेत किं, ब्राह्मणधर्म हिंदू धर्म एक नसून ते भिन्न आहेत त्याप्रमाणे त्यांचा विचार झाला पाहिजे. आणखीन एक गोष्ट लक्षात येते ती अशी किं, हिंदू परंपरा जास्त करून शाक्त, तंत्र अघोर परंपरांशी निगडीत असतात. ह्याचे कारण, बहुतेक हिंदू, जे मुख्यता क्षत्रिय, वैश्य शुद्र वर्णांचे असतात, ह्या परंपरांशी निगडीत आहेत. फारच थोडे हिंदू जे ब्राह्मणांच्या प्रभावाखाली असतात ते वैदिक परंपरा जपतात. असें सुद्धा दिसते किं, ह्या वैदिक परंपरा शाक्त, तंत्र आणि अघोरी परंपरा ह्यांचे विलक्षण असें मिश्रण सामान्य हिंदूंच्या जीवनात झालेले आढळते. उदाहरणार्थ, देवी पुजा हिंदूंची ब्राह्मणांची ह्यात बराच फरक आहे. हिंदूंत गुरव देवांच्या पुजा करतात, तेथे ब्राह्मणाने पुजा करावयाची नसते पण आज आपण पहातो किं, ब्राह्मणांनी सर्व देवस्थानांचा ताबा घेतला आहे. हिंदू देवीला मांसाचा प्रसाद देतात ब्राह्मण शाकाहारी प्रसाद देतात. हिंदूंच्या परंपरांत ढवळाढवळ करणे हा ब्राह्मणांचा एक उद्योग झाला आहे. हे असें अनेक वर्षे चालू आहे. अनेक वर्षे ब्राह्मण पुरोहित वर्ग हिंदूंच्या धार्मिक व्यवहारात हस्तक्षेप करून त्याद्वारा हिंदूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयास करीत आहेत. आजपर्यंतचा हिंदू बहुधा अशिक्षित असल्यामुळे ते सहज शक्य होत होते, पण आता परिस्थिती बदलत आहे. सामान्य हिंदूसुद्धा आता बर्यापैकीं सुशिक्षित झाला आहे त्यामुळे त्याच्यात त्याच्या हिंदूपरंपरांबद्दलची एक वेगळी जागृती झाली आहे. आता अशा परिस्थितीत हिंदू परंपरा त्यांच्या शुद्ध स्वरूपांत पहाण्याची गरज असल्याचे अनेक सुशिक्षित हिंदूंच्या लक्षात आले. ह्या दृष्टीने मी येथे एक प्रयत्न केला आहे किं, हिंदूंना त्यांच्या सतत उत्क्रांत होणार्या परंपरांची कांहीं माहिती मिळावी. ह्यामागील उद्देश असा किं, ह्यापुढे ब्राह्मणांचा हिंदूंच्या व्यवहारातील सुळसुळाट कमी होईल. पुढील चर्चा सुरु करण्या आधी आपण ब्राह्मण धर्म हिंदू धर्म (परंपरा) ह्यांतील ठळक फरक पाहुया. ब्राह्मण प्रामुख्याने अर्ध शाकाहारी असतात. अर्ध शाकाहारी अशासाठी किं, ते दूध त्यापासून बनलेले पदार्थ नेमांने त्यांच्या आहारात ठेवतात. येथे प्रामुख्याने असे लिहीण्याचे कारण, अनेक ब्राह्मण ऋग्वेदी परंपरेनुसार मांसाहार करतात. एकंदर ब्राह्मणांतील ४५ टक्के ब्राह्मण जैनांच्या प्रभावाखाली आहेत ते आज अर्ध शाकाहारी असून ५५ टक्के ब्राह्मण उभयाहारी आहेत. उभयाहारी म्हणजे, असे जे शाकाहार मांसाहार दोनही करतात. जरी मांसाहारी ब्राह्मणांची संख्या जास्त असली तरी शाकाहारी ब्राह्मण जास्त संघटीत असून ते शाकाहाराचा प्रचार जोमांने करीत असल्यामुळे सर्वच ब्राह्मण शाकाहारी असल्याचा हिंदूसुद्धा शाकाहारी असल्याचा आभास त्यांनी निर्माण केलेला आहे. हिंदू प्रामुख्याने मांसाहारी असतात. शाकाहारी ब्राह्मण जैन विचाराच्या प्रभावाखाली वावरत असतात त्यासाठी ते अर्ध शाकाहार करून त्यांची नक्कल करतात असें दिसून येते. वास्तविक पहाता मनुस्मृतीच्या आदेशानुसार पाहता सर्व ब्राह्मण मांसाहारीच असावयास पाहिजेत पण तसे दिसत नाही. ते असें कां झाले ते आपण नंतरच्या भागात पहाणार आहोत. आजचे ब्राह्मण जरी वैदिक धर्माच्या गोष्टी करीत असले तरी प्रत्यक्षात ते जैन धर्माचे अनुकरण करीत असतात. म्हणजे वस्तुतः आजचा ब्राह्मण हिंदूधर्मापासून फार दूर गेला आहे. तो छुप्या जैनधर्माचे अनुचरण करीत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वस्तुतः त्यांना हिंदूंच्या पुजाविधी करण्याचा हक्क नाही तरी सामान्य हिंदूंच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवून ते हिंदूंच्या देवतांच्या पुजा करीत आहेत. हे सर्व अतिशय चुकीचे होत आहे. हे सर्व तेव्हांच थांबेल जेव्हां खरे हिंदू सावध होतील.
हिंदू कोण? पुढे क्रमशः चालू -
मनुस्मृतीचा पांचवा भाग सुरू - २३
अग्नीतून उत्पन्न झालेले महान ऋषी भृगु ह्यांच्याकडे पाहून थोर ऋषी बोलले, आतापर्यंत आपण स्नातकांची कर्तव्ये सांगितली आता सांगा
अहो देवऋषी, आता सांगा, मृत्यूचे सामर्थ्य ब्राह्मणांवर कसें असते जर ते वेद जाणतात व पवित्र शास्त्राचा अभ्यास करतात, जे त्यांची कर्तव्ये आपण सांगितल्या प्रमाणे योग्य प्रकारे पार पाडतात.
मनुचा गुणवान मुलगा, भृगु, त्यावर सांगतो, ऐका, एक सजा म्हणून पापाच्या कारणांने मृत्यू (आयुष्य कमी होणे ही सजा) ब्राह्मणांना प्राप्त होते. टीपः जर पाप केले नाही तर मृत्यू येणार नाही असें सुचवले गेले आहे.
ब्राह्मणांने अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, वर्तन बिघडल्यामुळे, कर्तव्य न केल्यामुळे, नको ते खाल्यामुळे, मृत्यू अनिवार्य ठरतो.
द्विजाने लसूण, कांदा, अळंबी व अशी घाणीत उत्पन्न होणारी म्हणून खाऊ नये.
झाडाला इजा करून त्यातून वाहणारे द्रव्य (डिंक), सेलू नांवाचे फळ, गाय व्याल्यानंतर दिलेले पहिले घट्ट दूध (खरवस) खाऊ नये.
तीळ घालून शिजवलेला भात, गव्हा बरोबर लोणी, ताक, दूध, साखर, दूधभात, चपात्या, जर श्राद्धासाठी नसेल तर खाऊ नये. तसेंच मांस जर अर्ध्य देऊन शुद्ध केलेले नसेल तर ते खाऊ नये, जे जेवण देवांना अर्पण केलेले आहे ते खाऊ नये. टीपः श्राद्धात खाणे एरवी खाणे ह्यात येथे भेद केला आहे. श्राद्धात वाढलेले जेवण तो पितर देवांचा प्रतिनीधी म्हणून खात असतो तसे खाण्यास मनाई नाही. परंतु स्वतासाठी खाण्यास मनाई आहे. म्हणजे हे पदार्थ देव पितरांसाठी खाद्य आहे ब्राह्मणांसाठी नाही असे सुचवले आहे.
गाय व्याल्यानंतर दहा दिवसांनंतर येणारे दूध, उंटीणीचे दूध, एका खुराच्या (घोडा) प्राण्याचे दूध, बकरी, शेळी, गांभण असलेली गाय ह्यांचे दूध घेऊ नये.
म्हैशीचे दूध खावे, इतर प्राणी, बाईचे दूध व आंबलेले पदार्थ खाऊ नयेत.
फाटलेले दूध, त्यापासून बनवलेले पदार्थ, फळे, फुलं कंदमूळं ह्यांपासून बनवलेले खाद्य पदार्थ खाण्यास मनाई नाही. १०
मांसाहारी जनावरे (कुत्रा, मांजर इत्यादी), गांवात वावरणारी पाळीव जनावरे, एक खूर असलेली (घोडा, गाढव, खेचर इत्यादी), माश्यात सुरमई, तित्तीभ नांवाचे मांसे खाऊ नयेत. ११
चिमणी, प्लाव पक्षी, हंस, ब्राह्मणी बदक, गांवठी कोंबडा, सारस पक्षी, रघुदल पक्षी, सुतार पक्षी, पोपट, रानकोंबडा, १२
जे पक्षी चोंच मारून दाणे टिपतात, ज्यांच्या पायांची बोटे पदराने जोडलेली असतात, कोयस्थी पक्षा जे माती पायांनी खुरडतात, जे पाण्यात पोहतात, खाटीकखान्यातील सुकवलेले मांस खाऊ नये. १३
बगळा, बलक करकोचा, डोमकावळा, गिधाड, खंगारीतक, मासे खाणारी जनावरे, गांवठी डुक्कर, आणि सर्व प्रकारचे मासे, १४
जो ब्राह्मण मांस खाईल त्याने त्या प्राण्याने खाल्लेले जनावरांचे मांस सुद्धा खाल्ले असें समजावे. जर तो मासे खाईल तर त्या माशाने रे खाल्ले ते सुद्धा त्यांने खाल्ले असें समजावे. १५
असें असले तरी प्रथीन रोहीत हे मासे खाण्यास हरकत नाही. जर श्राद्धात असें सर्वप्रकारचे पदार्थ असतील तर ते खाण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे, सिंहतुंडास, ससाल्फ हे मासे केव्हाही खाण्यास हरकत नाही. १६ टीपः येथे नमुद केलेल्या माश्यांची हल्लीची नांवे माहीत नाहीत.
माहीत नाही अशा प्राण्याचे, पक्षाचे व माशाचे मांस खाऊ नये. आजारी, रोगट, एकटा प्राणी असेल तर, त्याचे मांस ब्राह्मणांनी खाऊ नये एरवी खाण्यास हरकत नाही. पांच बोटे असलेले (माणूस, माकड इत्यदी) अशांचे मांस खाऊ नये. १७
साळींदर, शिकारी कुत्रा, गेंडा, कासव, ससा हे केव्हाही खाण्यास चांगले समजावेत. तसेंच ज्यांना एकच दातांचा जबडा आहे असें प्राणी उंट सोडून, खावेत. १८
जो ब्राह्मण जाणून बुजून अळंबी, गांवठी डुक्कर, लसूण, कांदा, खाईल त्याला वाळीत टाकावे. १९
जर अजाणता ब्राह्मणांने खाल्ले तर त्यांने प्रायश्र्चित्त म्हणून सम्तन (किख्र) किंवा चंद्रायन तपस्या करावी. तसेंच खाल्ल्याचे लक्षात आल्यावर एक दिवस व रात्र अनशन करावे. २०
वर्षातून एकदा ब्राह्मणांने किख्र तपस्या करावी प्रायश्र्चित्त करावे कारण नकळत असें खाल्ले जाण्याची शक्यता असते. परंतु जर मुद्दाम खाल्ले असेल तर त्याने चंद्रायन विधीत दिलेली तपस्या करावी. २१
खाण्यासाठी सांगितलेले सर्व प्राणी ब्राह्मणांने स्वतः पाळलेले असावेत ते खाण्यासाठीच मारले जावेत त्यांना मारण्याचे कामसुद्धा ब्राह्मणानेच करावे. कारण असें पूर्वी अगस्त ऋषीनी केले होते. २२
असें होण्याचे कारण, फारपूर्वी सनातन धर्मात पिंड मांसाचाच असें. (हल्ली भाताचा दिला जात आहे). तिनही वर्णाच्या लोकांनी मासे मांस खावयाचे असते. शुद्राने पाळलेल्या प्राण्यांचे मांस द्विजांनी खाऊ नये. २३
मनुस्मृतीचा पांचवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा