सोमवार, ११ जानेवारी, २०१६

श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील भेद काेणते?

हल्ली श्रद्धा अंधश्रद्धा ह्यावर बरीच चर्चा हाेत आहे. श्रद्धा म्हणजे विश्र्वास आणि अंधश्रद्धा म्हणजे आंधळा विश्र्वास. हे सर्व सुरू हाेते माणसाच्या समजांतून म्हणजे माणसाला एकाद्या विषयाची किती कशा पद्धतीची समज आहे त्यावरून. ह्या समजाचे दाेन प्रकार आढळून येतात. वाचून अथवा ऐकून जी गाेष्ट समजते त्याला आपण माहिती असें म्हणताे. जेव्हां माणूस अशा ऐकीव अथवा वाचीव माहितीवर विश्र्वास ठेवताे तेव्हां त्याला अंधश्रद्धा असे समजावे लागते कारण त्या माहितीचा त्याला अनुभव नसताे. परंतु, जेव्हां माणसाला एकाद्या माहितीचा अनुभव येताे तेव्हां मात्र त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर हाेत असते. ज्ञान माहिती असे हे समजाचे दाेन प्रकार आहेत. माहितीवर विश्र्वास ठेवणे ज्ञानावर विश्र्वास ठेवणे ह्यातील फरकावरून अंधश्रद्धा श्रद्धा ह्यातील फरक स्पष्ट हाेताे.
एक उदाहरण घेऊन हा मुद्दा समजणे साेपे हाेईल. समजा, एक माणूस आहे ज्याने कधी साखर खाल्लेली नाही. त्याला साखरेची गाेडी म्हणजे काय ते माहित नाही. त्याला सांगितले कीं साखरेची चव गाेड असते तर ती झाली माहिती त्याच्यासाठी, आणि जर त्या माणसाने त्या माहितीवर विश्र्वास ठेवला तर ती हाेते त्याची अंधश्रद्धा. परंतु, जेव्हा त्या माणसास साखर खाण्यास दिली तेव्हा त्याला साखरेची गाेडी म्हणजे काय ते समजते म्हणजे त्याला माहितीचा अनुभव आला, त्यानंतर अनुभव आल्यामुळे त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर झाले.
आपण पुस्तके, वर्तमानपत्रे वगैरे वाचून तसेंच इतर माध्यमांतून जे मिळवताे ते माहिती असते, ज्ञान नव्हे हे आधी लक्षात घेतले पाहिजे. अशा रितीने मिळवलेल्या माहितीचा जेव्हां अनुभव येताे तेव्हां ती माहिती ज्ञान हाेते. माणूस त्याच्या आयुष्यात जास्त करून माहितीच्या जाेरावरच आपली कामे करीत असताे. म्हणजे, अंधश्रद्धा ही माणसाला जगण्यासाठी आवश्यक असते. आज जाे विराेध हाेत आहे ह्या अंधश्रद्धेला ताे तात्त्विक दृष्ट्या कसा चुकीचा आहे हे ह्यावरून लक्षात येईल. शाळेत अापण जे शिकताे ते सर्व माहिती असते, ज्ञान नव्हे! अापल्या जीवनांत ज्ञानाचा भाग फारच थाेडा असताे. बरीचशी कामे आपण माहितीच्या द्वारा म्हणजे अंधश्रद्धेनेच करीत असताे. अशा परिस्थितीत त्यावर बंदी कशी घालावयाची हांच आता प्रश्र्न पडलेला आहे.
हे अंधश्रद्धा विराेधी लाेक बहुधा देवावरील अंधश्रद्धेबद्दल बाेलत असतात. ते लाेक हे विसरतात किं, अंधश्रद्धा ही केवळ देवा पुरती मर्यादीत नाही, तीचा व्याप फार माेठा आहे. जर माणसांने ही अंधश्रद्धा ठेवण्याचे ठरविले तर त्याला जगणे अशक्य हाेईल हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अंधश्रद्धा श्रद्धा ह्यातील माेठा फरक येथे आपण लक्षात घेतला पाहिजे ताे असा किं, अंधश्रद्धा चुकीची असू शकते परंतु, श्रद्धा कधीही चुकीची असू शकत नाही. स्वानुभवाने जे समजले ते कधीही चुक असू शकत नाही. नेहमीच माहितीचे ज्ञानांत रुपांतर करतां येत नाही हेसुद्धा अापण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बहुतेक वेळी माहितीच्या मदतीनेच म्हणजे अंधश्रद्धेच्याच मदतीने कामे करावी लागतात. चुकीच्या माहितीवर जर तुम्ही काही काम केले तर ते चुकणारच त्याप्रमाणे हे हाेत असते. अध्यात्म साधनेत नेहमी माहितीच्या मदतीने साधक आपली साधना सुरू करताे जर ती माहिती चुकीची असेल तर ताे चुकीच्या मार्गाने भरकटत जाताे. परंतु, जर ती बराेबर असेल तर ताे त्याच्या साधनेत यशस्वी ठरताे. अध्यात्माबाबत माहितीचे ज्ञानात रुपांतर करण्याच्या क्रियेला साधना म्हणतात. आपला हिंदू धर्म सांगताे किं, मीच ईश्र्वर आहे, हे आपण वाचून समजताे परंतु ते ज्ञान नाही तर केवळ माहिती असते. पण जर साधकाने याेगसाधना केली तर त्याद्वारा त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर झाले असे हाेते म्हणजे, प्रत्यक्ष ईश्र्वराच्या साक्षात्काराने ते हाेत असते.
शेवटी हे लक्षात घ्यावे कीं, माहिती ज्ञान ह्यांवर अंधश्रद्धा श्रद्धा हे अवलंबून असतात. अंधश्रद्धा नाकारणे म्हणजे माहितीचे मार्ग बंद करणे असे हाेते.
आता, मनुस्मृतीचा तिसरा भाग श्र्लाेक ३६ – ५० वाचू या.
अहाे ब्राह्मणांनाे, आता मनुने ह्या विविध लग्न विधींचे काय मुल्यमापन केले आहे ते एेका. ३६ टीपः हल्ली मुलीकडून हुंडा घेतला जाताे त्याचा उल्लेख मनुस्मृतीत नाही. मनुस्मृतीनुसार हुंडा मुलाकडून मुलीच्या बापास द्यावयाचा असताे. तसेंच ती रक्कम त्या मुलीला कन्याधनाच्या रुपाने परत करण्याचा संकल्प दिला आहे.
ब्रह्म लग्नातून जन्मलेला मुलगा जेव्हां काही स्तुत्य कार्य करताे तेव्हां ताे त्या द्वारा त्याचे दहा पूर्वज व नंतरचे दहा वंशज अशा एकंदर एकवीस पिढ्यांचे कल्याण करीत असताे. ३७
देव लग्नातून जन्मलेला मुलगा जेव्हां काही स्तुत्य कार्य करताे तेव्हां ताे त्या द्वारा त्याचे सात पूर्वज व नंतरचे सात वंशज अशा एकंदर पंधरा पिढ्यांचे कल्याण करीत असताे. अर्श लग्नातून जन्मलेला मुलगा जेव्हां काही स्तुत्य कार्य करताे तेव्हां ताे त्याच्या तीन पुर्वज व तीन वंशजांचे अशा सात पिढ्यांचे कल्याण करीत असताे. प्राजापत्य लग्नातून हाेणार्या मुलाच्या चांगल्या कार्यामुळे एकंदर सहा पिढ्यांचे कल्याण हाेत असते. ३८ टीपः जसे चांगल्या कार्याचे बाबत तसेंच कुकर्माचे सुद्धा असते असे समजावे.
पहिल्या चार लग्न प्रकारातून हाेणारी अपत्ये तेजस्वी, बुद्धिमान, वेदांचे अध्ययन सहजपणे करणारे असतात व म्हणून शिष्ठसंमत हाेतात. ३९
अनेक उत्तम गुणांनी युक्त असे ते सर्व प्रकारचे आनंद भाेग घेणारे, ज्ञानी, सुप्रसिद्ध व जनमान्य असे हाेतात आणि दिर्घायुषी असतात. ४०
नंतरच्या चार सदाेष लग्न प्रकारांपासून हाेणारी संतती दुर्गुणी, दुष्ट, कपटी, खाेटे बाेलणारी, वेद व पवित्र नियमांचा अपमान करणारे असे असतात. ४१
सदाेष लग्नापासून सदाेष संतती हाेते व निर्दाेष लग्नापासून निर्दाेष संतती हाेते. ४२
समान वर्णातील पत्नीसाठी लग्न विधी दिला आहे, परवर्णातील स्त्री बराेबर लग्नाचा विचार करू या. ४३
क्षत्रिय मुलीस वरच्या वर्णातील मुलांबराेबर लग्न करतांना धनुष्य हाती धरावे लागते, वैश्य मुलींनी अंकुश धरावे व शुद्र मुलींनी नवर्याचे वस्त्र धरावे. ४४
पर्वकाळ साेडून एरवीच्या काळात केव्हाही नवरा आपल्या पत्नीसह समागम करून तृप्त हाेऊ शकताे. पत्नीस संतुष्ट करण्यासाठी त्याने तिच्या इच्छेनुसार संभाेग सुख तिला देत जावे. ४५ टीपः पर्वकाळात मात्र पतीने पत्नीपासून दूर रहावे.
महीन्याचे साेळा दिवस व रात्री स्त्रीस संभाेगासाठी याेग्य समजला जाताे. अर्थात, तिचे ऋतुचे दिवस वगळावेत. ४६
महीन्याचे पहिले चार दिवस व अकरावा आणि तेरावा दिवस संभाेगासाठी वर्ज असतात. इतर रात्री संभाेगासाठी याेग्य समजाव्यात. ४७
सम तारखेस संभाेग घेतला तर त्यापासून पुत्र रत्न हाेण्याचा संभव असताे. विषम तारखेस कन्यारत्न संभवते. म्हणून पुत्राची अपेक्षा असलेल्यानी त्या तारखेस संभाेग करावा. ४८
पुत्र हाेण्यासाठी पुरुषाचे शुक्रजंतू स्त्रीच्या रेतापेक्षा जास्त शक्तिमान असावे लागतात. जर स्त्रीचे रेत जास्त शक्तिमान असतील तर कन्या हाेण्याचा जासत संभव असताे. जर समसमान असतील तर नपुसक हाेण्याचा संभव असताे. जर दाेनही अशक्त असतील तर गर्भधारणा न हाेण्याचा संभव असताे. ४९
जाे त्या सहा रात्री व दुसर्या अाठ रात्री स्त्रीपासून दूर रहाताे ताे खर्या अर्थाने विद्यार्थ्यासारखा ब्रह्मचारी ठरताे. ५०
पुढील पाेस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू रहातील.
संपर्क ईमेल – ashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या -मेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा