बुधवार, १ मे, २०१९

हिंदू कोण – ६५


मागील भागातून पुढे
१६. मृत्यू नंतरचे जीवन
७९. ह्या संदर्भात आणखीन एक उदाहरण पाहू या. बर्याच वर्षापूर्वीची ही सत्य घटना आहे. एक वृद्ध महिला तिच्या नातवाच्या घरात रहात होती. तिचा तेथे वेळोवेळी अपमान होत होता. ती बिचारी असहायपणे ते सर्व गुपचुप सहन करीत रहात होती. अखेरीस तिचा मृत्यू झाला व तिचे दिवसवार केले गेले. तिला शिधा वाढला गेला. एका केळ्याच्या पानावर ते जेवण वाढले होते. एका अशा जागी ते ठेवले किं, कावळे तेथे येतील. पण आश्र्चर्याची बाब अशी किं, एकही कावळा आला नाही. असे बरेच दिवस ते तेथे होते पण कावळाच काय त्याच्या आजूबाजूनी फिरणारे उंदीर, घुशीसुद्धा त्याला स्पर्श करीत नव्हते. त्यावर धुळ जमू लागली व कालांतराने ते त्या धुळीत झाकले गेले. शेवटी पावसाच्या पाण्याने ते वाहून गेले. हा प्रकार वरकरणी सामान्य वाटला तरी हा तितका साधा प्रकार नाही हे संशोधकांच्या लक्षात आले. स्वाभाविकपणे कोणी जीवजिवाणू ते खावयास पाहिजे होते परंतु, तसें झाले नाही. साधी माशी, झुरळ असें कोणतेही त्याला कां नाही लागले? ह्याचे कारण काय? त्याचे स्पष्टीकरण असें सांगतात किं, भूताला दिलेले जेवण त्याचा हक्क असतो व कोणताही प्राणी तो हक्क टाळत नाही. ह्या उदाहरणातील म्हातारीच्या भूतानी ते जेवण राखून ठेवले व त्याद्वारा आपला तिरस्कार तिने व्यक्त केला.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ८१ -९०
ब्राह्मणाची हत्त्या करणे हे महापातक समजले जाते. म्हणून राजाने ब्राह्मणाची हत्त्या करणार्याचा साधा विचार सुद्धा करू नये. ३८१
जर वैश्याने सुरक्षित क्षत्रिय अथवा वैश्य स्त्रीशी लगट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला असुरक्षित ब्राह्मणीशी तसे केल्याची शिक्षा करावी. ३८२ टीपः येथे सुरक्षित म्हणजे लग्न झालेली असा घ्यावयाचा. असुरक्षित म्हणजे कुमारिका, विधवा, परित्यक्ता, भिकारीण किंवा वृद्धा असा घ्यावा.
जर ब्राह्मणांने सुरक्षित क्षत्रिय अथवा वैश्य स्त्रीशी वगट केली तर त्याला एक हजार पन्ना दंड करावा. जर सुरक्षित शुद्र स्त्रीशी क्षत्रिय अथवा वैश्य पुरूषानी प्रयत्न केला तर त्याला एक हजार पन्ना दंड करावा. ३८३
असुरक्षित क्षत्रिय महिलेशी वैश्य पुरूषाने समागम करण्याची शिक्षा आहे, पांचशे पन्ना दंड. क्षत्रिय पुरूषाने केला तर त्याची गाढवाच्या मुतांने हजामत करून पांचशे पन्ना दंड करावा. ३८४
जर ब्राह्मणाने असुरक्षित क्षत्रिय, वैश्य अथवा शुद्र महिलेशी समागम, सलगी केली तर दंड पांचशे पन्ना करावा. चांडाळ स्त्रीशी संभोग केला तर एक हजार पन्ना देड करावा. ३८५
ज्या राजाच्या राज्यात कोणी चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, कोणी कोणाची बदनामी करत नाही, कोणी कोणाची हत्त्या करत नाही, कोणी कोणावर हल्ला करत नाही, मारामार्या होत नाहीत म्हणजे त्याच्या राज्यात तमोगुणी लोक नाहीत असा राजा इंद्रपदी जातो. ३८६
हे पांच गुन्हे (चोरी, व्.भिचार, बदनामी, हत्त्या व हल्ला) नियंत्रित करण्याने तो राजा सर्व सामर्थ्यवान समजला जातो. ३८७
यजमान जो पुरोहिताचा त्याग करतो, जो पुरोहित यजमानाचा त्याग करतो, ज्यामुळें यज्ञ बिघडतात, (हा मोठा गुन्हा समजला आहे) अशा दोघांना प्रत्येकी शंभर पन्ना दंड करावा. ३८८
जातीच्या नांवाला काळिमा लागेल असें कोणतेही कृत्य केलेले नसतांना जर कोणी आपले आप्त जसें, आई, बाप, मुलगा, पत्नी, मुलगी ह्यांना टाकले तर तो गुन्हा ठरतो. त्यासाठी सहाशे पन्ना दंड सांगितला आहे. ३८९
जेव्हां द्विजांमध्ये कोणाचे कर्तव्य काय ह्या मुद्यावर वाद होतो तेव्हां राजा, जो स्वतः भले चिंतीतो, घाईने निर्णय घेणार नाही. ३९०
क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

हिंदू कोण – ६४

मागील भागातून पुढे –
१६. मृत्यू नंतर चे जीवन –
७८. श्राद्धाबाबतचे एक उदाहरण पाहू या.
आमच्या घरी एक तरुण मुलगा नेहमी येत असें. तो माझ्या भावाशी विशेष जवळचा होता. माझा भाऊ व त्याची पत्नी त्या मुलाला पुत्रवत माया देत असत. एकदा तो लिंगायत जातीचा तरुण त्याच्या गावी गेला व तेथे नदीत बुडून मेला. त्याच्या घरच्या मंडळींनी त्याचे दिवसवार त्यांच्या रितीरीवाजानुसार केले हे सर्व आम्हाला समजले. असेंच कांहीं दिवस गेले व एके रात्री माझ्या भावाच्या बायकोच्या स्वप्नात तो मुलगा आला. तो अतिशय उदास, खिन्न व ज्या चड्डीत तो मेला त्या पेहेरावात भिजलेल्या अंगाने तिच्या पुढे उभा राहिला. नेहमी हसरा आनंदी असणारा तो खेळकर स्वभावाचा मुलगा अशा अवस्थेत पाहून तिला आश्र्चर्य आणि वाईट वाटले. तो कांहींही बोलला नाही फक्त उभा होता. दुसर्या दिवशी तिने हे तिचे स्वप्न घरात सांगितले. आम्हा सर्वांना त्या स्वप्नांने वाईट वाटले. मी भावजयीला सुचवलें किं, तिने दुसर्या दिवशी काऊ घास त्याच्या नांवाने द्यावा. ते लक्षात घेऊन तिने त्या मुलाला आवडणार्या पदार्थांचा शिधा तयार केला व कावळ्याला वाढला. त्यानंतर कांहीं दिवसानंतर तो मुलगा तिच्या स्वप्नांत पुन्हा आला. मात्र ह्यावेळी तो त्याच्या नेहमीच्या रुबाबदार कपड्यात आणि त्याच्या नेहमीच्या आनंदी मुद्रेत आला होता. खूप हसत होता जणूकाय त्याला तो शिधा पोहोचला होता. त्यानंतर तो पुन्हा कधीच आला नाही.
ह्याचा अर्थ असा होतो किं, मृतात्म्यास शिधा त्याला प्रिय असणार्या मांणसांनी देणे आवश्यक असते. म्हणून हिंदू लोकांनी हे लक्षात घ्यावे किं, आपला कोणी प्रिय माणूस दिवंगत झाला तर त्याच्या नांवांने एकवेळ काऊघास जरूर द्यावा म्हणजे त्याच्या आत्म्यास शांति मिळेल. त्याच्या कुटुंबियाने सर्व वार दिवस केले असतील आपल्याला काय करावयाचे, असा विचार करून त्या गोष्टींकडे दुर्लत्र करू नये.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ७१ -८०
जर एकादी बाई तिच्या नातेवाईकांच्या मोठेपणाच्या घमेंडीत अथवा स्वताच्या तोर्यात येऊन नवर्याशी नीट वागत नसेल तर तिला भर चौकात कुत्र्याला खाण्यास द्यावे म्हणजे तिच्यानर भुकेली कुत्री सोडावीत. ३७१
परंतु, जर अशारितीने पुरूष स्त्रीशी वागला तर त्याला तापलेल्या लोखंडाच्या तव्यावर झोपवून मरे पर्यंत जाळावे. ३७२
एकदा व्यभिचार केलेल्या पुरूषास पुन्हा दुसर्या वर्षी तोंच गुन्हा करतांना सापडला तर, दुप्पट दंड करावा. असें तो पुन्हा पुन्हा करीत असेल तर दरवेळी दंडाची रक्कम वाढवत जावे. जर तो उनाड व चांडाळ स्त्रीशी समागम करील. ३७३
शुद्राने द्विजाच्या असुरक्षित स्त्रीवर जबरदस्ती केली तर त्याचे लिंग छाटावे. जर ती सुरक्षित असेल तर त्याचे सर्वस्व त्याच्या पासून काढून घ्यावे. ३७४
सुरक्षित ब्राह्मणीशी वैश्याने समागस केला तर त्याची संपत्ती काढून घ्यावी व त्याला एक वर्षासाठी कैद करावे. जर क्षत्रियाने तसे केले असेल तर त्याला एक हजार पना दंड करावा व गाढवाच्या मुताने त्याचे मुंडण करावे. ३७५
जर एकाद्या ब्राह्मणीशी क्षत्रियाने व वैश्याने अनैतिक संबंध असतील तर त्या वैश्य पुरूषास पांचशे पना दंड व्हावा व क्षत्रियांस एक हजार पना दंड व्हावा. ३७६
जर अशा क्षत्रियांने आणि वैश्याने एकाद्या उच्च कुलीन ब्राह्मणीशी अनैतिक नाते जोडण्याची हिम्मत केली तर त्या दोघांना शुद्राप्रमाणे शिक्षा करावी. म्हणजे सुक्या गवताच्या गंजीत बसवून जाळून टाकावे. ३७७
ब्राह्मणांने सुरक्षित ब्राह्मणीशी जबरदस्तीने सुत जमवले तर त्याला एक हजार पना दंड करावा. तिच्या संम्मतीने असेल तर पांचशे पना दंड करावा. ३७८
ब्राह्मणांना फाशी देता येत नाही कारण त्यामुळे वेदांचा अपमान होतो म्हणून त्याचं मुंडण करावे. इतर वर्णाच्या इसमांस त्याच्या गुन्ह्यासाठी शिरच्छेद करावा. ३७९
जरी ब्राह्मणाने कांहीही गुन्हा केला तरी त्याला मारता येत नाही म्हणून त्याला त्याच्या संपत्तीसह देशातून सहीसलामत हाकलून द्यावे. ३८०
क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

सोमवार, ४ मार्च, २०१९

हिंदू कोण – ६३

मागील भागातून पुढे –
१६. मृत्यू नंतरचे जीवन –
७७. माझी आई १९९० मध्ये दिवंगत झाली. त्या नंतर कांही महिन्यानंतर ती एकदा माझ्या स्वप्नात आली व म्हणाली, "अशोक मी येथे सुखरुप आहे परंतु एक अडचण आहे किं, येथे मला जेवणात मीठ मिळत नाही. तर तू मला मीठ दे." असें स्वप्न पडल्यावर मला जाग आली व ते स्वप्न मी चांगले आठवू शकलो. त्यानंतर मला झोप आली नाही. जागेपणी विचार करीत होतो किं, आता ह्या मृत आईस मीठ कसें द्यावयाचे? ह्या विषयाचा माझा अभ्यास बर्यापैकी असल्यामुळे माझ्या लक्षात आलें किं, जर मृतात्म्यास कांहीं द्यावयाचे असेल तर ते घराच्या खिडकीबाहेरील पट्टीवर ठेवावयाचे असते. कारण, भुते खिडकीच्या बारीवर बसून घरात डोकावून बघत असतात. ती सहसा घरात शिरत नाहीत. हे लक्षात आल्यावर दिवस उजाडण्याची वाट पहात तसांच पडून राहीलो. दिवस उजाडल्यावर मी प्रथम एक चमचा मीठ घेऊन स्वयंपाकघराची खिडकी उघडली, तो काय पहातो, खिडकीच्या बरोबर समोर असलेल्या एका मातीच्या ढिगार्यावर एक मोठा कावळा जणूकाय माझी वाट पहात बसल्या सारखा तयार होता. मी खिडकीच्या बाहेरील पट्टीवर मीठ ठेवतांच तो कावळा झपकन तेथे आला व ते मीठ चोंचेत घेऊन उडून गेला. त्यानंतर दररोज मी मीठ तेथे ठेवत होतो पण ते मीठ घेण्यासाठी कोणी कावळा आला नाही. त्यानंतर मी मीठ ठेवणे बंद केले. ह्याचा अर्थ एकदांच मीठ देण्यांने तिची गरज भागली होती, ह्याचा अर्थ हे मीठ मांगणे माझी मीठ देण्याची दानत पहाण्यासाठी होते. अशारितीने आपले पूर्वज आपली परीक्षा पहात असतात. त्यानंतर कोणी मला सांगितले किं, कावळा मीठ बिलकूल खात नाही म्हणून श्राद्धाच्या पिंडात मीठ जास्त असेल तर त्या पिंडाला कावळा शिवत नाही. म्हणून श्राद्धाच्या जेवणात मीठ घालू नये.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू ६१ -७०
एकदा ताकीद दिली कीं, त्याने दुसर्याच्या बायकोशी बोलावयाचे नाही तरी तो बोलण्याचा प्रयत्न करतांना आढळला तर त्याला एक सुवर्ण एवढा दंड करावा. ३६१
हा नियम कलाकार, कलावंतीण वर्गातील सोकांना लागू होत नाही, कारण तेथे तसेंच जीवन असते. तसेंच जेथे बायकांचे राज्य आहे तेथेसुद्धा हा नियम लागू होत नाही. ३६२
असें असले तरी त्यांतील कोणी माणूस गुपचुप अशा बायकांशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असेल तिच्या इच्छेविरुद्ध तर तो शिक्षेस पात्र ठरतो. तसेंच स्त्री दासी, संन्यासिनी, ह्यांच्या संमतीशिवाय प्रयत्न करील तर तो त्या स्त्रिच्या तक्रारीनंतर दंडास पात्र ठरतो. ३६३
जो इसम कुमारिकेस तिच्या इच्छे विरुद्ध बळजबरी करतो त्यास देहदंडाची शिक्षा आहे. परंतु, जर ती कुमारिका राजी असेल तर तो शिक्षेस पात्र ठरत नाही. जर ते दोघेही एकाच जातीचे असतील. ३६४
जर कुमारिका तिच्या वरच्या जातीच्या पुरूषाशी प्रयत्न करत असेल तर त्या पुरूषास कांहीं दोष लागत नाही. परंतु, जर खालच्या जातीच्या पुरूषांवर प्रयत्न करत असेल तर तिच्या घरच्यानी तिला नजरकैदेत ठेवावे. ३६५
खालच्या जातीचा पुरूष जर वरच्या जातीच्या बाईशी प्रेम करत असेल तर त्याला देहदंडाची शिक्षा आहे. पण तो त्याच्या बरोबरीच्या जातीच्या मुलीशी प्रेम करत असेल तर त्याला तिच्याशी लग्न करावे लागेल. अर्थात् मुलीच्या घरच्या लोकांच्या परवानगीने. ३६६
जर कोणा पुरूषानी मुलीवर बलात्कार करून तिला नासवले तर त्याच्या हाताची दोन बोटे ताबडतोब छाटून टाकावीत. त्याशिवाय सहाशे पना दंड लावावा. ३६७
जो पुरूष मुलीच्या मर्जीने तिला नासवतो त्याला समाजात शिस्त रहावी अशा गोष्टी होऊ नयेत, म्हणून दोनशे पना दंड करावा पण त्याची दोन बोटे छाटली जाणार नाहीत. ३६८
एक कुमारिका दुसर्या कुमारिकेस समलिंगी करण्यास भाग पाडेल तर तिला त्या दुसर्या मुलीच्या लग्नाचा खर्च द्यावा लागेल व दोनशे पना दंड होईल. त्याशिवाय असें पुन्हा होऊ नये म्हणून तिच्या गुह्य भागावर दहा छड्या माराव्यात. समलिंगी संबंध करणार्या पुरूषांस देहदंड द्यावा. ३६९
जर मोठ्या बाईने लहान मुलीशी समलिंग केले तर मात्र तिचे मुंडम करावे त्याशिवाय तिच्या हाताची दोन बोटे छाटावीत आणि तिची गांवातून धिंड काढावी. ३७०
क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१९

हिंदू कोण – ६२

मागील भागातून पुढे –
१६. मृत्यू नंतर चे जीवन –
७६. प्रत्येक माणसाचा जीवनाच्या अखेर मृत्यू येणे क्रमप्राप्त असते. हिंदू परंपरेनुसार मेल्यानंतर ते शरीर अग्निसंस्कार करून नष्ट करायाचे असते. असे करण्या मागील कारण समजून घेऊ या. मृत्यूनंतर त्याचा आत्मा शरीराबाहेर त्या शरीराभोवती घुटमळत असतो. असे समजतात किं, एका सुक्ष्म तंतूनी त्याचा लिंगदेह त्याच्या उरस्थीस पकडून रहातो. जर तो देह जाळून टाकला तर तो बंध संपुष्टात येऊन तो आत्मा त्या देहाच्या बंधनातून मुक्त होतो. परंतु जर तो देह तसांच कुजत ठेवला तर तो देह पूर्णपणे कुजून नष्ट होईस्तोवर तो आत्मा व त्याचा लिंगदेह तसांच तेथे तडफडत रहातो. कुजल्या नंतर सुद्धा जोपर्यंत त्याची उरस्थी शाबूत आहे तोवर तो आत्मा त्या ठिकाणी तडफडत रहातो. त्यामुळे त्या प्रेतात्म्याचा उद्धार होत नाही. म्हणून हिंदूंत मृत्यूनंतर देहास अग्निसंस्कार करणे आवश्यक समजले जाते. जारण मारण विद्येत मृताची उरस्थी वापरून त्यात अडकलेला प्रेतात्मा पकडून त्याला गुलाम करण्याची पद्धत आहे. म्हणून जितक्या लवकर मृत देह नष्ट करता येईल तितक्या लवकर तो जाळून नष्ट करावयाचा असतो.
हिंदू मान्यतेनुसार माणूस मेल्यावर त्याचा प्रेतयोनीत प्रवेश होत असतो. म्हणजे मेल्या बरोबर त्याचा आत्मा लिंगदेहासह प्रेतात रुपांतरीत होतो. देह नुकताच सोडलेला असल्यामुळे तो आत्मा संभ्रामावस्थेत असतो. त्याच्या भोवती आघीच मेलेल्या माणसांची भूतं जमा होतात व त्याचे मुल्यमापन करू लागतात. हे असें होते जसें विद्यापीठात नव्याने जाणार्या विद्यार्थ्याचे मुल्यमापन जुने विद्यार्थी करतात. मला म्हणावयाचे किं, ती जुनी भूतं त्या नवीन प्रेताचे मानव योनीतील स्थान अजमावण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व मृत्यूनंतर दहा दिवसानंतर सुरु होत असते. म्हणजे मृत्यूनंतर ताबडतोबचे दहा दिवस तो मजेत असतो. ह्या दहा दिवसांत तो संभ्रमावस्थेतून बाहेर आलेला असतो. जेव्हां अशी चाचपणी सुरु होते तेव्हां त्या मृतात्म्याची खरी परीक्षा सुरु होत असते. हल्ली आपण जे रॅगिंग म्हणतो तो जाच त्या नवीन प्रेताचा सुरु होतो. हा काळ त्या भूतासाठी नवीन व मोठा त्रासदायक असतो. ज्या मृतात्म्याचे पृथ्वीवरील आप्त त्याला त्याच्या मृत्यूनंतर आठवून त्याला प्रेमांने आणि सन्मानपूर्वकपणे अर्ध्य देतात त्या मृतात्म्याचा जाच होत नाही पण ज्याचे आप्त त्याला विसरतात अशा मृतात्म्याचा फार जाच होतो. त्यामुळे तो मृतात्मा आपल्या पृथ्वीवरील आप्तांस शाप देतो. अशा शापामुळे त्या आप्तांना अनेकप्रकारचे त्रास भोगावे लागतात. ते कुटुंब अनेक प्रकारच्या अडचणीत पडते कारण, मेलेला माणूस म्हणजे त्याचे प्रेत फार शक्तिमान असते असें समजले जाते. त्यात जर तो मृत माणूस असंतुष्ट आत्मा असेल तर त्याचा शाप विशेष त्रासदायक असतो. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंच्या शास्त्रात मृतात्म्याचे श्राद्ध चांगल्या रितीने सन्मानपूर्वक असे करावे असें सांगितले आहे. मग तो मृत इसम जीवंतपणी कितीही मामुली असो. कांहीं हिंदू त्याची शांति करतात व ते योग्य असते. त्या मृत इसमाकडे त्याच्या जीवंतपणी आप्त मंडळींनी दुर्लक्ष केले असेल तर, ती व्यक्ति मेल्यावर मात्र असें दुर्लक्ष करणे कुटुंबास हानिकरक ठरू शकते. हिंदूंनी शक्यतर कोणाचाही कधीही अवमान करू नये. अशारितीने, जेव्हा मृत व्यक्ति त्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्याने संतुष्ट होते तेव्हां ती आप्तांस आशिर्वाद देते, तो आशिर्वाद त्या आप्तांस त्यांच्या दैनंदिन जीवनात महत्वपूर्ण असतो. ह्यासाठी हिंदूंमध्ये मृतांचे श्राद्ध करणे आवश्यक समजले जाते. मृत व्यक्ति केव्हा मेली त्या दिनांकानुसार श्राद्ध करणे चांगले पण ते शक्य नसेल तर पितृपक्षात न विसरता श्राद्ध करावे. जस जसे काळ सरकतो व मृत व्यक्तिचे पिशाच्च बनते तसें कदाचित श्राद्ध न करतां फक्त शिधा अथवा पिंडदान करून आपला आदर व्यक्त केला तरी ते पुरेसे असते. कारण आता तो मृतात्मा जुना झालेला असतो, त्याला इतर पिशाच्च सतावू शकत नाहीत. त्यातसुद्धा जर ती व्यक्ति सात्त्विक होती असे असेल तर त्याच्या पिशाच्चास विशेष अधिकार प्राप्त झालेले असण्याची शक्यता असते. जसा काळ सरकतो तसें त्या पिशाच्चास आप्तांची गरज उरत नाही व बहुतेक वेळा असे पिशाच्च त्या कुटुंबास विसरून जाते. कांहींवेळा त्याचा पुनर्जन्म होत असतो, असें झाले किं, त्याचे श्राद्ध करणे अथवा पिंडदान करणे निरर्थक असते. कांहीं वेळा मृतात्मा एकाद्याच्या स्वप्नात येऊन कांहीं मामुली इच्छा सांगतो, तसें झाले तर मात्र ती इच्छा त्वरीत पूर्ण करावी. येथे आप्त म्हणजे केवळ नातेवाईक असे नाही तर त्या व्यक्तिचे मित्रसुद्धा समजावेत. येथे माझे कांहीं अनुभव नमुद करतो त्यामुळे हा विषय समजणे अधिक सोपे होईल.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू -
हल्ला करणार्यावर प्रतिहल्ला करणे हा दोष नाही. मग ते सर्वांसमक्ष असो अथवा खाजगीत असो, तो क्षत्रियत्व समजावे. ३५१
जे पुरूष परस्त्रीशी लगट करतांत त्यांना राजा प्रथम भिती वाटेल अशी शिक्षा करील व तरी त्याच्यात सुधार झाला नाही तर त्या पुरूषाला बहिष्कृत केले जाईल. ३५२
व्यभिचारामुळें वर्ण व्यवस्था बिघडते. वर्णसंकर होतो, त्यातून पापबुद्धी, बेजबाबदारपणा वाढतो. त्यामुळें सर्वनाश होतो ३५३
जो माणूस एकादा व्यभिचार करतांना पकडला गेला आहे व आता पुन्हा दुसर्यांदा बाईशी लगट करतांना पकडला गेला तर अशा माणसाला खालच्या अमर्समण इतका दंड करावा. ३५४
पण जो माणूस कोणत्याही व्यभिचाराचा उद्देश न ठेवता परस्त्रीशी कांहीं योग्य कारणासाठी बोलेल तो निर्दोषी समजला जाईल. ३५५
जर कोणी पुरूष तीर्थक्षेत्री, गांवाबाहेर, नदीच्या तटावर, जंगलात, अशा जागी परस्त्रीशी बोलण्याचा प्रयत्न करील तर त्याला व्यभिचाराचा (समग्रहण) प्रयत्न केला म्हणून आरोपाखाली शिक्षा होऊ शकते. ३५६
परस्त्रीला भेटवस्तु देण्याचा प्रयत्न करणे, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, तिच्या भोवती पिंगा घालणे, तिच्या अलंकाराची स्तुती करणे, तिच्या शय्येजवळ जाण्याचा प्रयत्न करणे, ही सगळी समग्रहण केल्याची लक्षणं समजावीत. ३५७
परस्त्रीच्या खाजगी भागांना तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे अथवा तिला आपल्या अंगास स्पर्श करण्यास सांगणे अशा सर्व गोष्टी समग्रहण दोषात येतात. ३५८
समग्रहणाचा आरोप असलेला इसम देहदेडास पात्र होतो. त्यासाठी चारही वर्णांच्या स्त्रियांस फार जपून ठेवावे लागते. ३५९
वैद्य, कवी, वेदाचा अभ्यास करणारा, चित्रकार, सोनार, कासार हे लोक कामा निमित्ताने परस्त्रीशी बोलू शकतात. ३६०

क्रमशः पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.