सोमवार, २१ मे, २०१८

हिंदू कोण – ५३

मागील भागातून पुढे –
११. विचार करण्या बाबतचे मार्गदर्शन –

६७. आहार विहार झाल्यानंतर विचार हिंदूंनी कशाप्रकारे करावेत हे पहावे लागेल. माणसाच्या डोक्यात सतत विचार येत असतात. त्यांचे नियंत्रण करणे आवश्यक असते. कारण, ह्या विचारांतूनच आपण पाप, पुण्य करीत असतो. आणि ही पाप व पुण्य आपल्या ह्या व नंतरच्या जन्माची दिशा ठरवित असतात. जर विचार सुनियंत्रित असतील तर माणसाचे जीवन सुखी होत असते व जर ते अनियंत्रित असतील तर त्याचे जीवन दुःखमय होऊ शकते. आपल्या डोक्यात दोन प्रकारचे विचार येत असतात. एका प्रकारच्या विचारांना मनाचे विचार व दुसर्या प्रकारच्या विचारांना बुद्धीचे विचार असें समजले जाते. मनाचे विचार भावना व्यक्त करतात व बुद्धीचे विचार तर्कशुद्ध दृष्टीकोन व्यक्त करतात. मनाच्या विचारांत तर्कशुद्धता नसल्यामुळे ते अनियमित व कल्पनारम्य असतात. आपल्याला अशा दोनही प्रकारच्या विचारांची जगण्यासाठी आवश्यकता असते. तरी जर मनाला आवर घातला नाही तर त्याचे विचार माणसाला मार्गभ्रष्ट करू शकतात. त्यासाठी मनाच्या विचारांना नियंत्रित करण्यासाठी बुद्धीच्या विचारांची गरज असते. देहाच्या विविध गरजा पुरवण्यासाठी जीवाला विविध प्रकारचे विचार करावे लागतात. त्यात कांहीं मनाचे असतात व कांहीं बुद्धीचे असतात. मनांची माहिती ह्या भागात मनांचे प्रकार सांगितले आहेत त्यानुसार लिंगदेहाचे मन जीवाच्या मनावर दबाव आणण्याचा सतत प्रयत्न करीत असते. ह्या दोनही मनांचे विचार प्रामुख्याने भावनामय व बहुधा कल्पनारम्य असतात.
आत्म्याची बुद्धि ह्या दोन मनांना नियंत्रित करीत असते. अशारितीने विचारांच्या ह्या गुंतागुंतीतून आपले डोके विविध विचार सोडत असते. सामान्य माणूस हे विचार नियंत्रित करण्याचा सहसा प्रयत्न करीत नाही तर तो उलट अशा अनेक विचारात स्वताला गुंतून घेत असतो. जर कोणी हिंदू ह्या विचारांचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करील तर त्याला त्यात सुरुवातीला फार त्रास होतो. परंतु, सुसंस्कृत हिंदू तो जो आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवतो. असें नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम त्याला त्याच्या मनांत येणार्या विचारांचे निरीक्षण करावे लागते. ह्या नियंत्रण करणार्या विचारांना शिपाई बुद्धि असें समजतात कारण, ती अयोग्य विचारांना पायबंद घालत असते. आपल्या डोक्यात पापकारक विचार येऊ नयेत म्हणून ती तसें विचार करण्यापासून मनांला विरोध करते. एकाच वेळी परस्पर विरोधी विचार येण्याचे कारण, जीवाचे मन व लिंगदेहाचे मन अशा दोन मनांतील विचार एकाच विषयावर उत्पन्न होत असतात. आत्म्याच्या बुद्धीला त्यात निवड करावयाची असते व त्याप्रमाणे नंतर आपला देह काम करीत असतो. हिंदूंत अध्यात्म साधना करणे ही एक महत्वाची परंपरा आहे. त्यासाठी थोडे पहावे लागेल. अध्यात्म साधकाला त्याच्या विचारांचे नियमन व नियंत्रण करणे अत्यावश्यक असते. त्यासाठी प्रथम त्यांने आपल्या सर्व मने व बुद्धि विशिष्ट शिस्तीने काबूत ठेवावे लागतात. त्यासाठी तो प्रथम डोक्यातून सर्व विचार काढून टाकतो व पूर्णतया विचारहीन अशा अवस्थेत मेंदू नेतो. बर्याच प्रयत्नाने हें साध्य करता येते. अशारितीने हिंदू साधकाची अध्यात्म साधना सुरु होते. मेंदू विचारहीन अवस्थेत ठेवणे (ह्याला ध्यानसाधना असें समजतात) ही अध्यात्म साधनेची पहिली पायरी आहे. विचारहीन अवस्थेत मेंदू ठेवण्यामुळे आत्म्यासा आराम मिळतो व त्याचे शक्ति संवर्धन होते व त्यामुळे पुण्यसंच वाढतो. म्हणजे पुण्यसंच करण्यासाठी ध्यानसाधना करणे हा एक चांगला मार्ग असतो. सतत विनाकारण विचार करण्यामुळे पुण्यक्षय होतो म्हणून बिनकामाचे विचार करणे टाळावे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू २६१ -२७०
अशारितीने राजा नियमित करील दोन गांवांतील सीमा आणि त्याच्या खुणा मारील. २६१
विहीरी, टाक्या, तळी, बगीचे, आणि घरे ह्यांच्या सीमासुद्धा अशाच रितीने जुन्या शेजारीपाजारी ह्यांना साक्षीदार करून ठरविल्या जातात. २६२
जर शेजारचे लोक खोटे बोलतात असें सिद्ध झाले तर राजा त्यांना मधील अमर्समण एवढा दंड करील. २६३
जर कोणा धाक दडपशाही करून घर, टाकी, बगीचा, वगैरेच्या खोट्या सीमा बनवत असेल तर त्याला पांचशे पना दंड होईल. परंतु, जर तो निष्पापपणे चुकीची कबूली देईल तरी त्याला दोनशे पना दंड भरावा लागेल. २६४
एवढे करूनही सीमा ठरवणे शक्य होत नसेल तर चांगला राजा स्वताची जमीन देऊन त्याद्वारा सीमा निश्र्चित करील. तो अंतिम निर्णय असेल. २६५
अशारिताने सीमेचे नियम आहेत. ह्यापुढे बदनामीच्या दाव्याचे नियम पहावयाचे आहेत. २६६
क्षत्रियांने जर ब्राह्मणाची बदनामी केली तर त्याला शंभर पना दंड होईल. वैश्याने ब्राह्मणाची बदनामी केली तर त्याला एकशेपन्नास पना दंड होईल. शूद्राने केली तर त्याला शारिरीक छळाची शिक्षा केली जाईल. २६७
ब्राह्मणांनी क्षत्रियाची बदनामी केली तर त्या ब्राह्मणाला पन्नास पना दंड होईल. ब्राह्मणानी वैश्याची बदनामी केली तर त्या ब्राह्मणाला पंचवीस पना दंड होईल. ब्राह्मणानी जर शुद्राची बदनामी केली तर तो ब्राह्मण बारा पना दंड भरेल. २६८
एका द्विजाने दुसर्या द्विजाची बदनामी केली तर त्याला बारा पना दंड भरावा लागेल. तसेंच समान वर्णाच्या व्यक्तीने बदनामी केली तर बारा पना दंड होईल. जर शिवीगाळी केली तर दुप्पट (चोविस) दंड होईल. २६९
एकज म्हणजे द्विज जो नाही, शुद्र, दास्यु, म्लेच्छ वगैरे, अशांनी द्विजाचा अपमान केला तर त्याची जिव्हा कापण्याची शिक्षा आहे. २७०
क्रमशः पुढे चालू -

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.  

हिंदू कोण – ५२

सोमवार, ३० एप्रिल, २०१८

हिंदू कोण – ५१

मागील भागातून पुढे –
१०. आहारा नंतर विहाराबद्दलचे मार्गदर्शन -
संरक्षण – जगात माणसाला अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरी जावे लागत असते. त्यात स्वतःचे संरक्षण करणे हे एक महत्वाचे काम असते. जीवाला ह्या संरक्षणासाठीच्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या ह्यामध्ये येतात. शत्रुपासून संरक्षण हे एक महत्वाचे असते. रोगराई पासून संरक्षण, अपघातापासून संरक्षण, अशी अनेक संरक्षणे जीवाला हाताळावयाची असतात. सद्सदबुद्धी, म्हणजे योग्य अयोग्य हे समजण्याची बुद्धी, ही संरक्षणाचे काम करण्यात मार्गदर्शन करीत असते.
प्रजनन – देहापासून त्याच्या सारख्या देहाची निर्मिती होणे म्हणजे प्रजनन. ते जननेंद्रियांच्या व्यवहारातून जीव करून घेत असतो. ह्या प्रजनन क्रियेचा संबंध लैंगिक कामक्रिडांशी असतो व तेथे हा लिंगदेह मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करून माणसात जरुरीपेक्षा जास्त कामवासना वाढवण्याचे काम करीत असतो. लिंगदेहामुळे जीव व त्याचा देह प्रजनन क्रियेशिवाय एरव्ही लैंगिक क्रियांत देहाला गुंतवून ठेवतो व त्यामुळे अनेक इतर गुंतागुंतीच्या गोष्टी माणसाला अनुभवाव्या लागतात. हे सर्व त्या आत्म्याच्या पूर्वजन्माच्या भोगवट्यानुसार होत असते. हिंदूंमधील खरे योगी प्रजनना व्यतिरीक्त इतर कारणांसाठी लैंगिक क्रियांत स्वताला गुंतवून घेत नाहीत. ह्याबाबतचे मार्गदर्शन बहुधा हिंदूंना त्यांच्या पारंपारीक विचारांतून मिळत असते.
विश्राम – देहाला विश्रांतीची नितांत गरज असते. त्यात इतर गोष्टी जशा, विरंगुळा, करमणूक इत्यादि येतात. थकणे हे शरीराचे लक्षण असते. त्यासाठी वेळोवेळी शरीराला आराम देणे आवश्यक असते. जीव हा शरीराचाच एक हिस्सा असल्याने जीवाचे मनसुद्धा थकत असते. एका प्रकारच्या कामात कंटाळा आला तर दुसरे काम करणे हे एकप्रकारचे आराम करणे असते. संपूर्ण विश्रांती केवळ झोपण्यामुळे मिळते. मनाला आनंद देणार्या गोष्टी करण्यानेसुद्धा एकप्रकारचा आराम मिळतो. अशा विविध प्रकारच्या विश्रामाची व्यवस्था करणे हे जीवाचे काम असते. विश्रामाच्या बर्याच कामांत जीवाच्या इतर पोषण, संरक्षण, प्रजनन कामातील गोष्टींचा समावेश होत असतो. विशेषकरून प्रजनन कामातील लैंगिक व्यवहाराचा येथे उल्लेख करावा लागेल. अशाप्रसंगी मर्यादा तत्त्वाचा विशेष विचार हिंदूंने करावयाचा असतो. नाहीतर पापकर्म होण्याची शक्यता असते.
क्रमशः पुढे चालू -

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ४६ -६०
गांवाच्या सीमा स्पष्ट दिसाव्यात म्हणून राजा त्या सीमांवर दुधी चीक असणारे वृक्ष लावील. त्यात न्यग्रोध, अस्वत्थ, किमसुक, शेवरी, सालस, पालमेरी ताड, असें वृक्ष असतील. २४६
त्याशिवाय झुडपे, बांबू, समी, अनेक प्रकारच्या वेली, मातीचे बंधारे, वेताची बेटे असें सिमेवर वाढवून त्या गांवाच्या सीमा स्पष्ट करील. २४७
गांवाच्या सीमा जेथे मिळतात तेथे तलाव, विहीरी, झरे असावेत, तसेंच सीमेवर देवळे, सिमेचे खांब, वास्तुदेवाचे शिलालेख असें बांधावेत. २४८
राजाने लक्षात ठेवले पाहिजे कीं, लोकांच्या हलगर्जीपणामुळें सीमा धुरकट होतात. त्यासाठी तो राजा इतर अधिक स्पष्ट दिसणार्या खुणांची (सिमेचे खांब, वास्तुदेवाचे शिलालेख) व्यवस्था करील. २४९
त्याशिवाय दगड, हाडे, गाईच्या अथवा घोड्याचे केस, चोथा, मडक्याचे तुकडे, गाईचे सुकलेले शेण, वीटा, जळलेला कोळसा, दगडाचे गोटे, आणि वाळू २५०
अशा बराच काळ टिकून रहाणार्या गोष्टी राजा गांवाच्या सीमेवर एक हात आकारमानाचे खड्ढे करून त्यात पुरेल, त्यामुळें सीमा शोधणे सोपे होईल. २५१
ह्या व अशा अनेक प्रकारे राजा सीमेचे प्रश्र्न सोडवू शकतो. त्याशिवाय बराच काळ रहाणारे जुने स्थाईक लोक सीमा दाखवू शकतात. कांहीं ठिकाणी नदीचे पात्र सीमा ठरवते. २५२
जर अशा सीमा दर्शक खूणांच्या बाबत खात्री वाटत नसेल तर त्या भागातील जुन्या लोकांचा सल्ला घेऊन ते करावे. २५३
गांवाच्या लोकांच्या साक्षीत जाणकारांची जबानी घ्यावी. त्यात तक्रार दाखल करणारे निदान दोन असावेत. २५४
सर्वांच्या समक्ष जबानी घेतल्यावर सर्वसंम्मत सीमेबाबतचा निर्णय घेतला जाईल व त्याची लेखी नोंद त्यांच्या नावानिशी ठेवली जाईल. २५५
लाल फुलांच्या माळा गळ्यात घालून, लाल वस्त्र परिधान करून, शपथा घेऊन, खरेपणाला धरून सीमा प्रश्र्न सोडवल्याचा आनंद व्यक्त करावा. २५६
अशारितीने सर्वांच्या समक्ष सीमा ठरल्या तर ते निर्दोष ठरेल. परंतु, जर तसें नाहीं झाले व सीमा ठरल्याचे जाहिर केले तर तो गुन्हा ठरतो. व त्यासाठी त्यांना दोनशे पना दंड करावा. २५७
जर त्या गांवातील लोक साक्षी साठी आले नाहीत तर आजुबाजूच्या चार गांवांतील चांगले लोक राजाने बोलावून स्वसमक्ष सीमा निश्र्चित कराव्यात. २५८
जर तेसुद्धा जमले नाही तर राजांने त्या जवळील वनांत रहाण्यार्या मूळवासी (वनवासी) अशांच्या साक्षीने सीमा ठरवाव्यात. २५९
वनात शिकार करणारे, पक्षी पकडणारे परधी, गुराखी, मांसे पकडणारे, मुळं काढणारे, साप पकडणारे, लाकूडफाटा गोळा करणारे, असें वनवासी लोक असतात त्यांच्या साक्षीने सीमा ठरवाव्यात. २६०
क्रशः: पुढे चालू -

मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी